Ahilyanagar News : बाळासाहेब थोरातांच्या भावासह 9 ते 10 जणांची गुंडगिरी; थेट पंचायत समितीत घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

Sangamner Panchayat Office Attack : बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावासह काही लोकांनी थेट पंचायत समिती कार्यालयात जात संबंधित अधिकाऱ्याला मारहाण करायला सुरूवात केली. या मारहाणीत कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, यावेळी कार्यालयात एकच गोंधळ उडाल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
Sangamner Panchayat Office Attack
A chaotic scene inside a Sangamner panchayat office where a government employee was assaulted, highlighting the growing concern over workplace safety.Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News, 24 Mar : काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू शरद नाना थोरात यांच्यासह 9 ते 10 जणांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील पंचायत समिती कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

या मारहाणीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तालुका अभियान व्यवस्थापकावर कार्यालयात घुसून मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावासह काही लोकांनी थेट संगमनेर पंचायत समिती कार्यालयात जात संबंधित अधिकाऱ्याला मारहाण करायला सुरूवात केली. या मारहाणीत कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, यावेळी कार्यालयात एकच गोंधळ उडाल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

Sangamner Panchayat Office Attack
Rupali Chakankar : चहुबाजूंनी संकटात सापडलेल्या चाकणकरांच्या मदतीला गणेश मंडळ आलं धावून; बोट कापल्याच्या दाव्याचं खंडण करत 'तो' घटनाक्रमच सांगितला

दरम्यान, या मारहाण प्रकरणी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू शरद नाना थोरात यांच्यासह 9 ते 10 जणांविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Sangamner Panchayat Office Attack
Colombia Plane Crash : लष्करी ऑपरेशन दरम्यान मोठी दुर्घटना; हवाई दलाचं विमान कोसळलं, 66 जणांचा जागीच मृत्यू

तर या मारहाणीमागे नेमकं काय कारण आहे हे समोर आलं नसलं तरी शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सरकारी कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com