Rupali Chakankar : चहुबाजूंनी संकटात सापडलेल्या चाकणकरांच्या मदतीला गणेश मंडळ आलं धावून; बोट कापल्याच्या दाव्याचं खंडण करत 'तो' घटनाक्रमच सांगितला

Rupali Chakankar and Ashok Kharat Controversy : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खरात याच्या प्रभावाखाली चाकणकर यांनी तंत्र मंत्र विद्येसाठी आपली अनामिका जखमी केल्याचा दावा केला. तसेच हे काही तांत्रिक, अंधश्रद्धा विधीचा भाग असल्याचा त्यांनी सांगितले.
Rupali Chakankar seen with a bandaged finger during a public Ganesh aarti event, amid controversy linked to the Nashik astrologer case.
Rupali Chakankar seen with a bandaged finger during a public Ganesh aarti event, amid controversy linked to the Nashik astrologer case.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 24 Mar : नाशिक येथील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याला महिलांचा बलात्कार व शोषण केल्याच्या आरोपात अटक झाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावर खरातशी जवळचे संबंध असल्याचं समोर आल्यामुळे त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.

अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खरात याच्या प्रभावाखाली चाकणकर यांनी तंत्र मंत्र विद्येसाठी आपली अनामिका जखमी केल्याचा दावा केला. तसेच हे काही तांत्रिक, अंधश्रद्धा विधीचा भाग असल्याचा त्यांनी सांगितले.

शिवाय अंधारे यांनी चाकणकर यांच्या बोटाला पट्टी बांधलेल्या फोटोही दाखवले. यानंतर आता एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये रूपाली चाकणकर यांचे निवासस्थान असलेल्या धायरी परिसरातील काही लोक या अनामिकेला झालेल्या जखमेबाबत सांगताना पाहायला मिळत आहेत.

Rupali Chakankar seen with a bandaged finger during a public Ganesh aarti event, amid controversy linked to the Nashik astrologer case.
US Iran War Update : अखेर संपूर्ण जगाचा जीव भाड्यात पडला! 'या' तारखेला युद्ध संपणार! ट्रम्प यांनी दिली डेडलाईन

स्थानिक धायरीकरांच्या मते, विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या आरतीला दरवर्षी रूपाली चाकणकर या येत असतात. जे रूपाली चाकणकर यांचे फोटो दाखवले जातात त्या दिवशी त्या आरतीसाठी आमच्या गणेश मंडळामध्ये आल्या होत्या आणि आम्ही त्यांना रिसिव्ह करायला गेलो होतो. तेव्हा गाडीच्या दरवाजामध्ये त्यांचं बोट अडकलं.

त्यांच्या बोटाला जखम झाली आणि त्यातून रक्त येत होतं. तेव्हा त्यांनी तात्पुरतं त्या बोटाला टिशू पेपर लावला आणि त्या आरतीमध्ये सहभागी झाल्या. त्या आरतीचा व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळतील त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांच्या बोटाला झालेली जखम दिसेल.

Rupali Chakankar seen with a bandaged finger during a public Ganesh aarti event, amid controversy linked to the Nashik astrologer case.
Jayant Patil : जयंत पाटलांनी जीवाची बाजी लावून निवडून आणलेल्या नगराध्यक्षाची विकेट पडणार? पेठ-सांगली रोडवरील प्रकरण भोवणार

मात्र आता जे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. त्यामध्ये ध चा मा केला जातोय. कोणतीही शहानिशा न करता चुकीची माहिती दिली जात आहे. ती काय घडलं होतं याचे प्रत्यक्षदर्शी आम्ही आहोत. मात्र अंधश्रद्धा म्हणून ते चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे.

कोणतीही पोस्ट व्हायरल करताना त्या गोष्टीची शहानिशा करणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने बदनामी करणं अत्यंत चुकीचा असून त्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. व्हिडिओमधील स्थानिक नागरिक मागणी करताना पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com