Sangamner baba scam : भोंदू गडगे महाराज प्रकरणात मोठा ट्विस्ट! ‘मास्टरमाईंड’ नाशिकचा? मोहन पुरीचा खरातशी नेमका काय संबंध?

Ahilyanagar police intensify search for Mohanpuri, aide of Rajendra Gadge Maharaj, accused of cheating devotees under the guise of treatment : संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगे महाराज याच्या मागील मास्टर माईंड हा नाशिकमधील चार गुन्हे दाखल असलेला मोहनपुरी असल्याचे समोर आलं आहे.
Rajendra Gadge
Rajendra GadgeSarkarnama
Published on
Updated on

Sangamner baba scam : संगमनेरमध्ये दत्तधाम सरकार म्हणून दरबार चालवणारा, भोंदू राजेंद्र बापू गडगे महाराज याच्यामागील मास्टर माईंड हा नाशिकमधील मोहनपुरी असल्याचे समोर आले आहे. या मोहनपुरीविरोधात नाशिकमध्ये चार गुन्हे दाखल आहे.

राजेंद्र गडगे महाराज याच्याविरोधात गुन्हा दाखल होताच, तो पसार झाला आहे. मोहन पुरी याचा सिन्नर इथं औषध कारखाना पोलिसांनी सील केला आहे. मोहन पुरी देखील आश्रम चालवायचा. राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात आणि मोहन पुरी याचा काही संबंध आहे का? अशोक खरात याच्याशी या दोघांची स्पर्धा होती का? याचा देखील अहिल्यानगर पोलिस तपास करत आहेत.

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील वडगावपान इथल्या भोंदू राजेंद्र गडगे याचा फास अहिल्यानगर पोलिसांनी आणखी अवळला आहे. पोलिस तपासात गडगेच्या 13 मालमत्ता उघड झाल्या असून, अहिल्यानगर, राहता, नेवासा याठिकाणी देखील त्याची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

अवघी दुसरी शिकलेल्या गडगेची एवढी मालमत्ता कशी झाली, याचा शोध अहिल्यानगर पोलिस (Police) घेत आहेत. संगमनेर तालुक्यातील त्याचे मीरा नावाचे हॉटेल आहे. हे हाॅटेल देखील पोलिसांनी सील केले आहे. या हाॅटेलमधून पोलिसांनी आक्षेपार्ह औषधांचा साठा जप्त केला आहे.

Rajendra Gadge
Fake Baba Exposed : धक्कादायक! भोंदू राजेंद्र गडगेकडे 200 व्हिडिओ, 10 बँक खाते, 13 मालमत्ता; पोलिस तपासात मोठा खुलासा

दरम्यान, राजेंद्र गडगेच्या मागील बॉस, मास्टर माईंड हा नाशिकमधील मोहन पुरी असल्याचे समोर आलं आहे. भोंदूगिरीच्या गुन्ह्यात त्याला देखील अहिल्यानगर पोलिसांनी सहआरोपी केले आहे. परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार झाला आहे. याच्याकडून भोंदू गडगेबाबत आणि त्याने केलेल्या कृत्यांबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Rajendra Gadge
Jalna 31 crore bank scam : जालन्यातील बँकिंग क्षेत्रात खळबळ! शेतकऱ्यांची 177 बनावट खाती; 31 कोटींचा अपहार, फिर्यादीच निघाला घोटाळेबाज

सहआरोपी मोहन पुरी अद्याप पसार आहे. त्याची औषधे बनवणारी सिन्नर इथं फॅक्टरी आहे. ही फॅक्टरी पोलिसांनी सील केली आहे. हा मोहन पुरी देखील काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथं आपला आश्रम चालवत आहे. गडगे अन् पुरी दोघंही एकमेकांना या भोंदूगिरीच्या व्यवसायात सपोर्ट करत असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच मोहन पुरी याचा भोंदू अशोक खरात याच्याशी काही संपर्क आहे का? खरात याच्याशी गडगे अन् मोहन पुरी स्पर्धा करायचे का? याची देखील चर्चा आहे. त्या अनुषंगाने अहिल्यानगर पोलिस तपास करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोहन पुरी याच्यावर नाशिक जिल्ह्यात अगोदरच चार गुन्हे दाखल आहेत. भोंदू गडगेला अटक झाल्यानंतर, त्याचा साथीदार मोहन पुरी पसार झाला असून अहिल्यानगर पोलिस त्याचा शोधात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com