

Jalna bank fraud : जालना बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणारा घोटाळा समोर आला आहे. जालना मर्चंट बँक अन् पूर्णवादी बँक, अशा दोन बँकेत हे सुमारे 31 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.
या घोटाळ्यातील फिर्यादी बँक महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा हाच आरोपी निघाला आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत जालना पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखा पोलिासांनी सहा जणांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली.
जालन्यात (Jalna) दोनशे शेतकऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्र दाखवून, तब्बल 31 कोटींचा अपहार झाला आहे. जालना मर्चंट बँकेत 23 कोटी 33 लाखांचा, तर पूर्णवादी बँकेत 8 कोटी 12 लाखांचा अपहार झाला आहे. कदीम जालना अन् चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस (Police) निरीक्षक मिथुन घुगे यांच्या पथकाने या गुन्ह्यात तपास करत, सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यात धक्कादायक म्हणजे, जालना मर्चंट बँकेत अपहार झाल्याप्रकरणी फिर्याद देणाराच बँक महाव्यवस्थापक राजेंद्र टोकशा हा आरोपी निघाला आहे.
आरोपी निघाल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत रायचंद सखाराम कुरंगळ, निलेश्वर शेषराव भोसले, रामेश्वर विलासराव जाधव, ज्ञानेश्वर विलासराव जाधव, सुधाकर रावसाहेब ठोंबरे आणि राजेंद्र भिकचंद टोकशा यांना अटक केली आहे. या आरोपींना 27 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
वेअरहाऊसच्या नावाखाली 177 बनावट खातेदार तयार करून शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत बोगस कर्ज उचलण्यात आले. या घोटाळ्यात दलालांची मोठी साखळी असून, रायचंद सखाराम कुरंगळ याच्यासह इतर दलालांनाही अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी सांगितले. या घोटाळ्यामुळे जालन्यातील बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली असून, बँकेच्या कामाकाजावर रिझर्व्ह बँकेचे (RBI) निर्बंध लागू केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.