

Sangamner black magic case : अंनिसच्या पाठपुराव्यानंतर गुन्हा दाखल झालेला भोंदू राजेंद्र गडगे महाराज याच्याबाबत अहिल्यानगर पोलिसांना तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. भोंदूगिरीच्या जोरावर त्याने कोट्यवधींची मालमत्ता जमा केली असून, त्याची वेगवेगळी बँकांमध्ये दहा खाती सापडली आहे.
तसंच त्याच्याशी संबंधित 200 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. हे व्हिडिओ नेमके कोणत्या स्वरूपाचे आहेत, यावर पोलिसांनी अधिक खुलासा केलेला नाही. त्यामुळे भोंदू गडगे महाराजाभोवती अधिक संशयाचे जाळे निर्माण झाले आहे.
राजेंद्र गडगे महाराज याने दत्तधाम सरकार, असे नाव धारण करून संगमनेरच्या (Sangamner) वडगावपान इथं धर्माच्या नावाखाली मोठं साम्राज्य उभं केलं होतं. कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरा करण्याचा दावा तो करत होता. पुत्र प्राप्ती करून देतो, असे दावा करत होता. दारू सोडवण्यापासून ते घरातील अडचणी दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगून लोकांची फसवणूक करत होता.
या भोंदू राजेंद्र गडगे महाराज याचा गुरूवारी, रविवारी आणि अमावस्येच्या दिवशी दरबार भरत होता. याविरोधात अंनिसची तक्रार होती. पोलिसांकडे अधिकार असून देखील कारवाई होत नव्हती. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) विरोधात कारवाई झाल्यानंतर राजेंद्र गडगेविरोधात कारवाई व्हावी यासाठी अंनिस मोठा पाठपुरावा केला. यानंतर राजेंद्र गडगे याला संगमनेर पोलिसांनी अटक केली.
पोलिस कोठडीत असलेल्या राजेंद्र गडगेविरोधात आता गर्भधारण पूर्व और प्रसव पूर्व निदान तकनीक (PCPNDT) अधिनियमानुसार देखील गुन्हा दाखल होणार आहे. पुत्र प्राप्ती प्रकरणी संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजेंद्र गडगे याला नोटीस बजावली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी राजेंद्र गडगेबाबत तपासात धक्कादायक माहिती समोर आणली आहे. श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघमारे यांनी याबाबत माहिती दिली.
भोंदू राजेंद्र गडगे सध्या पोलिस कोठडीत असून, त्याच्याशी संबंधित 200 पेक्षा जास्त व्हिडिओ सापडले असून, ते केले आहेत. यासह त्याच्या दत्तधाम आश्रमातून अनेक संशयास्पद औषधे मिळाली आहेत. राजेंद्र गडगे याने संगमनेर तालुक्यात आणि परिसरात 13 मालमत्ता खरेदी केल्याचे तसेच वेगवेगळ्या दहा बँकांमध्ये राजेंद्र गडगे याची खाती आहेत. या सर्व चौकशीच्या फेऱ्यात असून, सर्व तपासणार आहोत, असे सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
राजेंद्र गडगेसंबंधित सापडलेल्या व्हिडिओचा फॉरेन्सिककडून अहवाल मागवण्यात येणार आहे. राजेंद्र गडगे याच्या दत्तधाम सरकारमध्ये 90 पेक्षा जास्त मेडिसीन सापडले आहेत, ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.