Jayashree Thorat protest : बिबट्यामुक्त तालुक्यासाठी जयश्री थोरात मैदानात; वनविभागाविरोधात 'जनआक्रोश' घुमणार!

Sangamner Taluka Leopard Issue: Jayashree Thorat Leads Protest Against Forest Department : संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग इथला सिध्देश कडलग या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या जयश्री थोरात यांनी जनआक्रोश मोर्चाची हाक दिली आहे.
Jayashree Thorat protest
Jayashree Thorat protestSarkarnama
Published on
Updated on

Leopard attack Sangamner : राज्यात बिबट्यानं उच्छाद घातला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचं दर्शन होत असल्याच्या चित्रफित समोर येत आहेत. काही ठिकाणी हल्ल्याच्या बातम्या समोर येत आहेत, तर काही ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात मानवी मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात बिबट्याच्या वाढत्या घटनांचे पडसाद उमटेल असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला.

या घटनेवर सर्वच वनविभागाच्या कारभारावर राजकीय, सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील या घटनेवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री थोरात आक्रमक झाल्या आहेत. संगमनेर तालुका बिबट्यामुक्त होण्यासाठी, वनविभागाच्या कारभाराविरोधात प्रांताधिकारी कार्यालयावर उद्या जनआक्रोश मोर्चाची हाक दिली आहे.

संगमनेरच्या (Sangamner) जवळे कडलग इथं बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार वर्षांचा चिरमुड्याचा मृत्यू झाला. सिध्देश कडलग, असे मृत्यू झालेल्या बालकाचं नाव आहे. यानंतर संगमनेरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता बिबट्यामुक्त संगमनेरचा नारा घुमू लागला आहे.

Jayashree Thorat protest
Siddaramaiah And DK Shivakumar watch controversy : लक्झरी घड्याळाच्या वादात अडकले सिद्धरामय्या अन् शिवकुमार; ‘नाश्ता डिप्लोमसी’ बैठकीत ‘जुळत्या घड्याळांची’ चर्चा रंगली

संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असून, तिथं बिबट्यांची खूप संख्या वाढली आहे. यामध्ये अनेक नरभक्षक बिबटे असून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा याकरता, सोमवारी (ता. 15) सकाळी 10 वा. संगमनेर बसस्थानक ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत जनआक्रोश मोर्चा आयोजित केला आहे, अशी माहिती संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी दिली आहे.

Jayashree Thorat protest
Railway route controversy : विमानतळ गेलं, रेल्वे गेली, हायवे अपूर्ण! मग आम्ही प्रवास काय..? शिवाजीराव आढळरावांचा संताप

बिबट्यामुक्त संगमनेर तालुक्यासाठी सरकार व वनविभागाविरोधात हा जनआक्रोश आंदोलन असणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. थोरात म्हणाल्या, "संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्याची संख्या वाढली आहे, ही संख्या नेमकी किती आहे, याची देखील वनविभागाला माहिती नाही. दररोज कुठे ना कुठे बिबट्या निदर्शनास येत असल्याच्या माहिती समोर येत आहे. याचा शेतकरी, नागरिकांच्या दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आता लहान मुलांचा देखील मृत्यू झाला आहे. यामुळे संगमनेरमध्ये बिबट्यांची मोठी भीती निर्माण झाली आहे."

Jayashree Thorat protest
Congress Politics : आणखी एका राज्यात काँग्रेसची सत्ता पक्की? ‘या’ निवडणुकीत भाजपसह विरोधकांना दिला झटका

बिबट्याच्या हल्ल्यात जवळेकडलग इथला चिमुरडा सिद्धेशला जीव गमावा लागला. याचबरोबर अनेक भागात नागरिकांवर बिबट्यांचे हल्ले झाले आहेत. वेळोवेळी मागणी करूनही सरकारकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील नागरिक आपल्यातील आक्रोशाला उद्या सोमवारी सोमवार मोर्चाद्वारे वाट मोकळी करून देणार असल्याचे जयश्री थोरात यांनी सांगितले.

या जनआक्रोश मोर्चामध्ये सर्व नागरिक, महिला, युवक, शेतकरी या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बिबट्या हटाव आंदोलन समितीने केले आहेत. तसंच डॉ. जयश्री थोरात यांनी देखील या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com