Sangram Jagtap : सरकार विरोधात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप न्यायालयात जाणार; काय आहे कारण?

Ahmednagar News : विविध विकास कामांना सरकारने स्थगिती दिल्याने राजकारण तापलं
MLA Sangram Jagtap
MLA Sangram Jagtap Sarkarnama
Published on
Updated on

NCP : अहमदनगर शहरातील सुमारे 50 कोटी रूपयांच्या विविध विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही स्थगिती उठवण्यात यावी, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सरकारच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविध विकास कामांसाठी तब्बल 50 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. या सरकारने कामांना स्थगिती दिली आहे.

MLA Sangram Jagtap
ICICI Lombard News: आयसीआयसीआय लोंबार्डवर गुन्हे दाखल, शिवसेनेने (ठाकरे) केला होता पाठपुरावा !

विद्यमान सरकारने मंजूर झालेल्या विकास कामांच्या निधीवर स्थगिती आणल्यामुळे आमदार संग्राम जगताप हे आक्रमक झाले आहेत. तसेत शहरातील विकासकामे ठप्प झाले आहेत. त्यामुळे ही स्थगिती मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, सरकारने यावर काहीच भूमिका घेतली नसल्याचे संग्राम जगताप यांनी सांगितले.

यामुळे आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं जगतापांनी सांगितलं. याविषयी बोलताना जगताप म्हणाले, ''ही स्थगिती न उठविल्याने उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सरकारचे उलट धोरण पाहायला मिळत आहे. मंजुरी दिलेल्या कामांना स्थगिती देण्याचं काम हे सरकार करत आहे. त्यामुळे हे विकासाचं सरकार नसून स्थगितीचं सरकार आहे'', अशी टीका त्यांनी केली.

MLA Sangram Jagtap
Chandrakant Khaire News : परिवर्तन अटळ, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा महाविकास आघाडीचीच सत्ता..

''कामाची स्थगित उठवण्यासाठी आम्ही सरकारमधील काही आमदारांना आणि मंत्र्यांना भेटलो. मात्र, आम्हाला यश आलं नाही. त्यामुळे आता आम्ही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. नगर शहरातील अनेक रस्त्यांचे कामं रखडली आहेत.

बस स्थानकासह शहरातील अनेक विकास कामं रखडली आहेत. त्यामुळे आता आमच्याकडे न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही, येत्या चार-पाच दिवसांत शहरातील कामांना दिलेल्या स्थगितीबाबत आम्ही न्यायालयात जाणार आहोत'', असं जगतापांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com