Sanjay Raut : गृह खातं शेण खात असलं तरी.., संजय राऊत यांचा कुणाल कामराला सल्ला

Sanjay Raut Advice To Kunal Kamra : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरांसोबत माझं बोलणं झाल्याचं म्हटलं आहे
Sanjay Raut ,Kunal Kamra
Sanjay Raut ,Kunal KamraSarkarnama
Published on
Updated on

Kunal Kamra latest : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं गायल्यानंतर तो चर्चेत आला आहे. राज्य भरात विविध ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मुंबईत खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. खार पोलिसांनी त्याला तिसऱ्यांदा समन्स बजावले असून आज (दि.५) चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. मात्र, अद्याप कुणाल कामरा एकदाही चौकशीसाठी हजर झालेला नाही.

त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरांसोबत माझं बोलणं झाल्याचं म्हटलं आहे. त्यांनी नुकतीच पत्रकारपरिषद घेऊन तशी माहिती दिली आहे. पत्रकारांनी त्यांना कुणाल कामरा यांच्यावर प्रश्न केला असता त्यांनी कुणाल कामरांना आपण सल्ला दिला असल्याचेही सांगितले.

Sanjay Raut ,Kunal Kamra
Ajit Pawar Vs Sharad Pawar : पवार काका-पुतणे आणखी एका मैदानावर लढणार; अखेर छत्रपती कारखान्याची निवडणूक जाहीर

संजय राऊत म्हणाले, कुणाल कामराने काय अपराध केला आहे? त्यांनी कुणाचा खून केला आहे का? की देशद्रोह केला आहे? ते बँकॉकला फिरत आहेत का? ते नवाब शरीफचा केक कापण्यास गेलेत का? त्यांच्यावर ईडी, सीबीआयने लूकआउट नोटीस काढली आहे का? त्यांनी एक कार्यक्रम केला तो काही लोकांना मान्य नाही इतकच ना.

ठिक आहे मात्र, या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझं कुणाल कामरा यांच्याशी बोलणं झालं आहे. मी त्यांना सांगितलं की, आपण कायद्याचे रक्षक आहोत जरी गृह खातं शेण खात असलं तरी आपल्याला कायदा पाहायला पाहिजे असा सल्ला मी त्यांना दिल्याचे राऊत म्हणाले.

राऊतांनी यावेळी शिंदे गटावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले शिंदे गटाचे लोक हे डरपोक आहेत. त्यांना घाबरवून पक्ष सोडायला लावला आहे. आम्हीच खरे शिवसेनेतील शिवसैनिक आहोत. वक्फ सुधारणा विधेयकावर बोलताना राऊत म्हणाले, या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबध आहे. भ्रष्ट्राचाराला फ्रेम करण्यासाठी हे बिल आणले आहे. भाजपचे मोठे नेते शेवटपर्यंत आमच्या संपर्कात होते. या बिलाला पाठींबा देण्याची विनंती त्यांनी केल्याचे राऊत म्हणाले.

Sanjay Raut ,Kunal Kamra
Congress Politics : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांचे नाशिकमध्ये 'जय श्री राम', रामनवमीच्या मुहूर्तावर जाणार काळाराम मंदिरात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com