Satyajeet Tambe News : सत्यजित तांबे संतापले; ‘अजून किती लोकांचे प्राण जाण्याची वाट पाहणार...?’

Warkari accident in Nagar : किमान पालख्या जाण्या-येण्याच्या वेळी तरी पोलिसांनी या मार्गावर गस्त घालण्याची मागणी या अपघातामुळे पुढे आली आहे.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : आळंदीकडे निघालेल्या पालखीमध्ये पाठीमागून कंटेनर घुसून झालेल्या अपघातात चार वारकरी ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले. पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात हा अपघात झाला. यावर आमदार सत्यजित तांबे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला, ‘अजून किती लोकांचे प्राण जाण्याची वाट पाहणार आहात?’ असा प्रश्न केला आहे. (Satyajeet Tambe angry with National Highways Department over the accident of warkari)

आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट शेअर केली आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना त्यांनी टॅग केले आहे. ‘वाढती वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहनचालक यांच्या वाढत्या घटना वारंवार समोर येत आहेत. या महामार्गाच्या सेवारस्त्यावरील (सर्व्हिस रोड) खड्डे बुजवण्यासाठी आणि पथदिव्यांसाठी वारंवार आंदोलने करीत आहोत. आता अजून किती लोकांचे प्राण जाण्याची वाट राष्ट्रीय महामार्ग विभाग पाहणार आहे," अशी प्रश्नार्थक करणारी पोस्ट आमदार तांबे यांनी शेअर केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satyajeet Tambe
Solapur Politics : पवारांनी प्रकल्प पळवलेला नाही, अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच होणार; चंद्रकांतदादांचे स्पष्टीकरण

शिर्डीहून संगमनेरमार्गे आळंदीकडे पालखी निघाली होती. या पालखीमध्ये मागून भरधाव आलेला कंटेरनर घुसला. हा अपघात संगमनेर तालुक्यातील घारगावमधील खंदरमाळ येथे झाला. या भीषण अपघातात बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी. ता. कोपरगाव), पालखीचे चोपदार बबन पाटीलबा थोरे (रा. शिर्डी), भाऊसाहेब नाथा जपे (रा. कनकुरी, ता. राहाता), आणि ताराबाई गंगाधर गमे (रा. कोर्हाळे, ता. राहाता) यांचा मृत्यू झाला.

अपघातात बिजलाबाई शिरोळे, राजेंद्र सरोदे, भाऊसाहेब गायकवाड, ओंकार चव्हाण, निवृत्ती डोंगरे, शरद चापके, अंकुश कराळ आणि मीराबाई ढमाले हे आठ जण जखमी झाले आहेत. अपघातातील दृश्यं हेलावून टाकणारी होती.

Satyajeet Tambe
Telangana Election Result : गुलाबी ॲम्बेसिडर तेलंगणामध्येच पंक्चर; सोलापुरातील BRS नेत्यांचा जीव टांगणीला

किमान पालख्या जाण्या-येण्याच्या वेळी तरी पोलिसांनी या मार्गावर गस्त घालण्याची मागणी या अपघातामुळे पुढे आली आहे. दरम्यान, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनीदेखील या अपघाताची दखल घेतली आहे.

Satyajeet Tambe
Assembly Election Result 2023 : अहंकारी माणसाला तीन राज्यांतील जनतेने दिले उत्तर; खासदार विखेंची राऊतांवर टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com