IT Company Sexual Abuse: नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक छळाची व्याप्ती मोठी! गिरीश महाजन यांनी केले अनेक खळबळजनक खुलासे

IT Company Sexual abuse: संघटित रॅकेटचा संशय, व्यापक तपासाची गरज असून आणखी काहींचा सहभाग समोर येण्याची शक्यता? महाजन यांनी व्यक्त केली आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : शहरात उघडकीस आलेल्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणानं गंभीर वळण घेतले असून या प्रकरणाची व्याप्ती अधिक मोठी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणात आणखी काहींचा सहभाग समोर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सर्वंकष आणि व्यापक तपासाची गरज निर्माण झाली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी हा प्रकार संघटित रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Girish Mahajan
Justice Varma Resign: घरात पैशांचं घबाड सापडलेल्या न्या. वर्मांनी राजीनामा का दिला? वरिष्ठ वकिलानं सांगितली तांत्रिक बाजू

नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, "नाशिक पोलिसांच्या तपासातून हा धक्कादायक प्रकार समोर आला असून आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून तपासाचा विस्तार अधिक मोठा असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात मुलींवर लैंगिक अत्याचार, धार्मिक दबाव आणि जबरदस्ती धर्मांतर करण्याचे प्रकार घडल्याचे आरोप आहेत. पीडित मुलींना विशिष्ट आहार घेण्यास भाग पाडणे, धार्मिक प्रथा पाळण्यास सांगणे तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचेही उघड झाले आहे. विशेष म्हणजे, नामांकित आयटी कंपनीत असे प्रकार घडत होते ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे"

Girish Mahajan
Maharashtra Budget Session : विधिमंडळात फुलांचा ‘ड्रामा’! भाजप आमदारांचा अनोखा, पण गंभीर मुद्दा! नेमका विषय काय?

तक्रारी करूनही संबंधित वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चार ते पाच जणांच्या टोळीमार्फत मुलींना नोकरीचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले जात होते. त्यानंतर फोटो आणि व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून त्यांचा छळ केला जात होता. तसेच पीडित मुलींना त्यांच्या मैत्रिणींनाही या जाळ्यात ओढण्यास भाग पाडले जात असल्याचे समोर आले आहे.

Girish Mahajan
Video: "आता राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा"; वांद्रे-वरळी 'सी लिंक'वर झळकल्या अनंत अंबानींना फोटोसह वाढदिवसाच्या शुभेच्छा; सोशल मीडियावर रणकंदन

या प्रकरणात केवळ मुलीच नव्हे, तर काही मुलांचेही धर्मांतर करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नोकरी आणि पैशांचे आमिष दाखवून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. या सर्व पार्श्वभूमीवर, परिसरातील इतर कंपन्यांमध्येही असे प्रकार घडत असण्याची शक्यता लक्षात घेऊन व्यापक तपास सुरू करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी नमूद केले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि कोणालाही माफी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पीडितांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Girish Mahajan
IT company Sexual Abuse: आयटी कंपनीतील महिलांचा धर्मांतरासाठी छळ; NIA, ATS करणार चौकशी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com