Video: "आता राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा"; वांद्रे-वरळी 'सी लिंक'वर झळकल्या अनंत अंबानींना फोटोसह वाढदिवसाच्या शुभेच्छा; सोशल मीडियावर रणकंदन

भारतातील बडे उद्योगपती RILचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांचा पुत्र अनंत अंबानी याचा आज वाढदिवस आहे. वयाची तिशी पूर्ण करुन अनंत अंबानीनं आता ३१ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.
Anant Ambani
Anant Ambani
Published on
Updated on

Anant Ambani Birthday : भारतातील बडे उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड अर्थात RILचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांचा धाकटा पुत्र आणि RIL चा कार्यकारी संचालक अनंत अंबानी याचा आज वाढदिवस आहे. वयाची तिशी पूर्ण करुन अनंत अंबानीनं आता ३१ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. यानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध 'वांद्रे-वरळी सी लिंक'वर अनंत अंबानीच्या फोटोसह शुभेच्छा देणाऱ्या लाईट्स झळकल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल झाला आहे. यावरुन सोशल मीडियामध्ये सध्या अक्षरशः रणकंदन पाहायला मिळत आहे.

नेमका विषय काय?

अनंत अंबानीचा १० एप्रिल रोजी वाढदिवस असतो. यंदाचा वाढदिवस त्याच्या हितचिंतकांनी खास करण्याचं ठरवलं आहे कारण वयाची ३० वर्षे तो पूर्ण करणार आहे. यानिमित्त विविध वर्तमानपत्रांमध्ये वाढदिवसानिमित्त जाहिराती देखील देण्यात आल्या आहेत. अनंत अंबानीशी संबंधित अनंत युवा प्रतिष्ठान, अनंत सेवा फाऊंडेशन आणि आय लव्ह मुंबई फाऊंडेशन या संघटनांच्यावतीनं प्रामुख्यानं या जाहिराती दिल्या गेल्या आहेत.

Anant Ambani
Ashok Kharat controversy: खरात प्रकरणावरून महिला नेत्यांत जुंपली! तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो? अंधारेंचा शितल म्हात्रेंना बोचरा सवाल

काल रात्री मुंबईतील वांद्रे ते वरळी हा सागरी पूल अर्थात 'सी लिंक'वर ज्या स्ट्रिप्स आहेत त्यावर लेझल लाईट्सद्वारे अनंत अंबानीच्या फोटोसह वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. याचा व्हिडिओ वृत्तसंस्था पीटीआयनं काल रात्री व्टिटरवरुन शेअर केला. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, या व्हिडिओवर पुढे शेकडो युजर्सनं कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये एका युजरनं विचारलं की, 'ही पेड जाहिरात आहे का?' आणखी एकानं विचारलं की, 'आता १० एप्रिल या दिवसी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी'. तसंच आणखी एका युजरनं म्हटलं की, 'तुमच्याकडं जर पैसा असेल तर तुम्ही सगळीकडं झळकता'. तसंच आणखी एक युजर म्हणतो की, 'मुंबईसारख्या जागतीक शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती होणं हे लाजीरवाणं आहे'. त्याचबरोबर काही स्थानिक मुंबईकरांनी देखील यासंदर्भात तक्रार केली आहे. 'शहरभर सगळीकडं अनंत अंबानीचे फ्लेक्स आणि पोस्टर्स लागली आहेत. गेल्या आठवडाभरापासून ही पोस्टर्स लागली आहेत त्यांनी संपूर्ण मुंबईच विस्तारुन टाकली आहे,' असं या नागरिकांनी म्हटलं आहे.

Anant Ambani
Maliwada Ves Heritage Conservation : माळीवाडा वेसवर बुलडोझर थांबला! कोर्टात याचिका; महापौरांना शिंदे शिवसेनेचा पहिला झटका

अजूनही काही युजर्सनं याप्रकारावर अत्यंत तिखड प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक जण म्हणाला की, 'सर्वसामान्य माणसाची ही थट्टा आहे', 'पैसा आणि सत्तेचा हा दुरुपयोग असल्याचं'ही एकानं म्हटलं आहे. 'या व्हीआयपी कल्चरला आता भारतातील जनता वैतागली आहे', असंही एकानं म्हटलं आहे. 'काही महिन्यांपूर्वीच याच अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याचं ओंगळवाणं प्रदर्शन देशातील जनतेनं पाहिलं होतं आता करदात्यांच्या पैशातून बांधलेल्या पुलावर अशा प्रकारे अब्जाधिशाच्या लेकानं वैयक्तिक जाहीरात करणं चुकीचं आहे' असंही एका युजरनं म्हटलं आहे.

दरम्यान, सी लिंकवर अशा प्रकारे कोणाचे फोटो झळकणं ही बाब नवी नाही, कारण यापूर्वीही अनेकदा सेलिब्रेटींच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारे फोटो सीलिंकच्या स्ट्रिप्सवर झळकले आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, सलमान खान यांचा सामावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com