Ram Shinde News: राम शिंदेंच्या बारामती दौऱ्यात सुरक्षेत गंभीर त्रुटी; दोषी पोलिसांवर मोठी कारवाई

Ram Shinde Political News: विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या 15 व 16 मार्च रोजीच्या बारामती, दौऱ्यादरम्यान सुरक्षा व राजशिष्टाचार विषयक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या.याप्रकरणी आता दोषी पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Prof. Ram Shinde
Prof. Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राम शिंदेंना भाजप विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड ताकद देतानाच थेट विधान परिषदेच्या सभापती निवड केली होती.तेव्हापासून भाजप आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यातला राजकीय संघर्ष उफाळला आहे. यातच आता राम शिंदे (Ram Shinde) यांच्या बारामती दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचारात कसूर झाल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे.

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बारामती (Baramati) दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचारात कसूर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून दोषी पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे हे 15 व 16 मार्च रोजी बारामती दौऱ्यावर आले होते.त्यावेळी त्यांच्या सुरक्षा व राजशिष्टाचारात कसूर झाल्याची गंभीर बाब समोर आली होती.याप्रकरणी सुरक्षाविषयक त्रुटींविषयी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. आता या चौकशीत कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Prof. Ram Shinde
Prakash Ambedkar On Pahalgam Attack: आंबेडकरांनी 'पहलगाम'वरुन मोदी सरकारला ललकारलं; म्हणाले, '56 इंच छातीच्या...'

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या 15 व 16 मार्च रोजीच्या बारामती, दौऱ्यादरम्यान सुरक्षा व राजशिष्टाचार विषयक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या.याप्रकरणी आता दोषी पोलिसांना दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई झालेल्यांमध्ये प्रवीण बाळासाहेब मोरे, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण 2) रविंद्र कोळी, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण 3) वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे यांचा समावेश आहे.

याचदरम्यान,सुवर्णा गायकवाड,परिविक्षाधीन महिला पोलीस उपनिरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे,शामराव यशवंत गायकवाड,पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण, रोहित दिलीप वायकर,पोलीस शिपाई पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण, सारिका दादासाहेब बोरकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल जिल्हा विशेष शाखा,पुणे ग्रामीण,वसंत सखाराम वाघोले, सहाय्यक फौजदार, पुणे ग्रामीण यांनी देखील कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झालं आहे. आता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत खातेनिहाय चौकशीची कारवाई करण्यात येणार आहे.

Prof. Ram Shinde
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांची बंदूक खेचली,अन्...! पर्यटकांच्या बचावासाठी एक काश्मिरी मुसलमान शेवटच्या श्वासापर्यंत लढला

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना हटविण्याबाबत मागील काही दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांची यामागे महत्वाची भूमिका असल्याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता. 15) नगरपरिषदेच्या कायद्यामध्ये सुधारणा करून नगरसेवकांकडूनच नगराध्यक्षांवर अविश्वास आणण्याची तरतूद केली आहे. या सुधारणेचे अध्यादेश निघताच काही तासांत मोठ्या घडामोडी घडल्या आणि कर्जतच्या नगराध्यक्षांविरोधात प्रस्तावही दाखल झाला होता.

नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात 13 नगरसेवकांनी बुधवारी (ता. 16) अविश्वास ठराव जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे दाखल केला आहे. नवीन तरतुदीनुसार हा ठराव दाखल झाला असून विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आहे.

Prof. Ram Shinde
India-Pakistan Tensions : आता पाकिस्तानची काही खैर नाही! दहशतवादी हल्ल्याने संतापलेल्या भारताने फास आवळला

नुकतेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये सुधारणा करत नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरींच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदींस मान्यता देण्यात आली. याच नव्या अध्यादेशाचा आधार घेत नगरसेवकांनी अविश्वास ठराव मांडला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com