Shahada Tehsildar News: तहसीलदारांच्या पत्नीचा अजब कारनामा! घरचा किराणा आणण्यासाठी वापरली सरकारी गाडी

Government Vehicle Used for Grocery Shopping in Shahada:शहाद्यात तहसीलदार संभाजी पाटील यांच्या पत्नीने घरगुती कामासाठी शासकीय वाहन आणि चालकाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Government Vehicle Used for Grocery Shopping in Shahada
Government Vehicle Used for Grocery Shopping in ShahadaSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथून प्रशासनाची प्रतिमा मलिन करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सामान्य नागरिकांना नियमांचे धडे देणाऱ्या महसूल प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांकडूनच शासकीय सुविधांचा कथित गैरवापर झाल्याचा आरोप होत आहे. शहादाचे तहसीलदार संभाजी पाटील यांच्या पत्नीने घरगुती किराणा खरेदीसाठी थेट सरकारी वाहन आणि शासकीय चालकाचा वापर केल्याची चर्चा सध्या जिल्हाभर रंगली आहे.

शहादा शहरातील नवजीवन मार्ट परिसरात तहसील कार्यालयाची शासकीय गाडी (MH39AB7580) उभी असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, या वाहनातून तहसीलदारांच्या पत्नी आपल्या लहान मुलांसह किराणा खरेदीसाठी आल्याचे सांगितले जात आहे. किराणा सामानाची वाहतूकही याच शासकीय वाहनातून करण्यात आल्याचा आरोप आहे, याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारी वाहनांचा वापर हा केवळ शासकीय कामकाजासाठी करण्याचे स्पष्ट नियम असताना, वैयक्तिक कामासाठी वाहन आणि चालकाचा वापर होत असेल तर तो जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्यासारखाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. सामान्य नागरिकांनी एखादा नियम मोडला तर तत्काळ कारवाई होते, मग अधिकाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Government Vehicle Used for Grocery Shopping in Shahada
NCPI News: विधानसभेत फक्त 822 मते; एका झटक्यात आता 20 खासदार! NCPIला राजकीय लॉटरी; पक्ष अचानक चर्चेत कसा आला?

प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियमांचा विसर पडला आहे का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण सरकारी गाडी ही कोणत्याही अधिकाऱ्याची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची खासगी मालमत्ता नसून ती जनतेच्या कराच्या पैशातून चालणारी सुविधा आहे. त्यामुळे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष झाले तर चुकीचा संदेश समाजात जाण्याची शक्यता आहे.

Government Vehicle Used for Grocery Shopping in Shahada
Pune News: 'ऑपरेशन ट्रान्सफर' सुरू! पुण्यात २८५ महसूल कर्मचाऱ्यांची खांदेपालट; वर्षानुवर्षे एकाच जागी असलेल्यांना धक्का

या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि गैरवापर झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर नियमांनुसार कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. आता जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे किती गांभीर्याने पाहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com