Video Sharad Pawar : आता कोणाचा गेम होणार! लोकसभेनंतर शरद पवार पुन्हा नाशिकच्या मैदानात

Sandeep Gulave And Sharad Pawar Nashik Teachers Constituency : महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यासाठी पवारांच्या समर्थकांनी दिलेली ताकद जमेची बाजू ठरणार का?
Sandeep Gulave
Sandeep Gulave Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Teachers Constituency : नाशिक विभाग शिक्षक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून संदीप गोपाळराव गुळवे उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. यातच आता उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यात सर्व शरद पवार समर्थक जोमाने कामाला लागल्याचे चित्र गेल्या आठवड्यापासून विभागातील सर्वच तालुक्यात दिसत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पन्नास वर्षापासून शरद पवार महत्त्वाचे केंद्रबिंदु राहिले आहेत. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक विभागात पवारांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यासाठी पवारांच्या समर्थकांनी दिलेली ताकद जमेची बाजू ठरणार आहे.

संदीप गुळवे यांचे वडील गोपाळराव गुळवे यांचा उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान होते. शिवाय पवार (Sharad Pawar) आणि गुळवे यांच्या परिवाराचे दृढ संबंध राहिले आहेत ते आजही तसेच आहेच. त्यामुळे शिक्षण संस्था व शिक्षण नेत्यांची मोट बांधायला शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. ही बाब विरोधकांसाठी नक्कीच काळजी वाढवणारी ठरणार आहे.

Sandeep Gulave
Kishor Darade On Vivek Kolhe : विवेक कोल्हेंना होमग्राऊंडवर येऊन घेरलं; 'आमदार दराडेंनी, काय काय सांगितलं...'

काय म्हणाले शरद पवार

काँग्रेसचे दिवंगत नेते गोपाळराव गुळवे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. नाशिक (Nashik) शिक्षकांसाठी त्यांचे सुपुत्र संदीप गुळवे महाविकास आघाडीकडून उमेदवारी करत आहेत. आज गोपाळराव हयात नसले तरी संदीप यांनी तोच जिव्हाळा कायम राखला आहे. त्यांच्या प्रचारात सर्व झोकून काम करत आहेत. मला खात्री आहे पाचही जिल्ह्यात शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न गुळवे हे त्यांच्यातील अभ्यासू वृत्तीने सभागृहात मांडून मार्गी लागतील.

Sandeep Gulave
Kishor Darade On Vivek Kolhe : विवेक कोल्हेंना होमग्राऊंडवर येऊन घेरलं; 'आमदार दराडेंनी, काय काय सांगितलं...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com