Ram Shinde insult case : उडालेल्या बल्बचे सभापती म्हणणं भोवलं! पवारांच्या शिलेदारावर विधिमंडळाचा कोप, जेलवारी ठरली...

NCP Sharad Pawar faction leader Suryakant More sentenced to civil imprisonment by legislature privilege committee for insulting BJP MLC Ram Shinde, confirms CM Devendra Fadnavis : जामखेडमधील आमदार रोहित पवार यांचे शिलेदार सूर्यकांत मोरे यांना विधिमंडळ सदस्यांचा, विशेष करून राम शिंदे यांचा अवमानाप्रकरणी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
Ram Shinde insult case
Ram Shinde insult case Sarkarnama
Published on
Updated on

Suryakant More jailed : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडमधील आमदार रोहित पवार यांचे शिलेदार सूर्यकांत मोरे यांना विधानपरिषद सदस्य, विशेष करून सभापती प्रा. राम शिंदे यांच्याविषयी अवमानकारण विधानं करणं भोवलं आहे.

विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीने सूर्यकांत मोरे यांना ठोठावलेल्या शिक्षेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली. विशेषाधिकार समितीच्या शिफारशीनुसार सात दिवसांची दिवाणी कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरमधील पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांनी 23 नोव्हेंबर 2025 रोजी जामखेडमधील सभेत विधान परिषद आणि सदस्यांबद्दल, विशेषतः राम शिंदे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनी सभापतींच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या अवमानप्रकरणी विधान परिषद विशेषाधिकार समितीने त्यांना सुरवातीला 30 दिवसांचा दिवाणी कारावासाची शिक्षा ठोठावावी, अशी शिफारस केली होती.

या शिक्षेविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात निवेदन सादर केले. ते म्हणाले, "जामखेडमधील सूर्यकांत मोरे (रा. रत्नापूर) यांना विशेषाधिकारी समितीने, सभापती आणि विधान परिषद सभागृह यांच्या प्रति माफीनामा घेऊन त्यांना मानहानीबाबत सक्त ताकीद देण्याची शिक्षा करण्यात यावी. मात्र त्यांनी तसे न केल्यास सात दिवस दिवाणी करावासाची शिक्षा देण्यात यावी."

Ram Shinde insult case
Rupali Chakankar Controversy : शिक्षिकेवर हल्ला, शेकडो युवक भोंदूगिरीच्या विळख्यात; रूपाली चाकणकरांचा 'बुवा-बाबा संरक्षण आयोग' रंजना गवांदेंकडून एक्सपोज!

'कारावासात पाठविलेल्या व्यक्तीस, विधान मंडळाचे अधिवेशन स्थगित झाल्यानंतर मुक्त केले जाते, ही वस्तुस्थिती आहे. विधानमंडळाची अधिवेशन स्थगित होण्यापूर्वी संबंधित अवमानकर्ते यांची लगेच मुक्तता होऊन आवश्यक तेवढा, त्यांचा शिक्षेचा कालावधी पूर्ण न झाल्यास, विधान परिषदेच्या एक किंवा अधिक अधिवेशनात, त्यांना देण्यात आलेल्या शिक्षेचा एकूण कालावधी पूर्ण होईपर्यंत पुढील अधिवेशनात त्यांना पुन्हा कारागृहात पाठवण्यात यावे,' असे शिक्षेचे निवेदन वाचून सांगताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Ram Shinde insult case
Rupali Chakankar Pressure Allegations : 'बिंग' फुटणार? अशोक खरात सावध; चाकणकरांचा पोलिसांवर थयथयाट? सर्व काही आलं समोर...

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "खरं म्हणजे समितीने अत्यंत कठोर शिक्षा याच्यामध्ये सुचवली होती. तसेच एकूणच त्यांचा, नंतरचा व्यवहार बघितल्यानंतर समितीने सुचवलेली शिक्षा अयोग्य नव्हती. पण मी माननीय सभापतींशी देखील चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय घेतला."

...तर याहीपेक्षा कठोर शिक्षेचा अधिकार!

'शेवटी कोणाला शिक्षा करणं हा याच्या पाठीमागचा उद्देश नाही तर, या सभागृहाचा सन्मान राहिला पाहिजे, हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून शिक्षा कमी केली आहे. परंतु याचा चुकीचा अर्थ घेऊन कोणी वारंवार, असे वागणार असेल तर या सभागृहाला याहीपेक्षा कठोर शिक्षा देण्याचा अधिकार आहे, हे मात्र त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे,' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सूर्यकांत मोरे नेमकं काय म्हणाले

'राम शिंदे उडालेल्या बल्बचे (आमदारांचे) सभापती असून त्यांच्या पेक्षा पंचायत समितीचा सभापतीला जास्त अधिकार असतात. वर्षातील 365 दिवसांपैकी अवघे 30 दिवसच यांचे काम असते. बाकी 335 दिवस लालदिव्याची गाडी आणि सोबत लवाजमा घेऊन मिरवायचे पद म्हणजे, विधान परिषदेचे सभापती होय. इकडे सांगायचे की मी 288 आणि विधान परिषदेचे 75 आमदारांचा हेडमास्तर आहे. वास्तविक पाहता ते फक्त 70 किंवा 75 आमदारांचे ते पण उडालेले बल्बचे सभापती आहे. इतर कोट्यातून आलेल्या आमदारांचेच ते सभापती आहे,' अशी जोरदार टीका सूर्यकांत मोरे यांनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com