Maharashtra Politics : खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. विनोद तावडे व जयंत पाटील यांची भेट झाल्यापासून या चर्चांचा वणवा पेटला आहे. पवारांच्या पक्षाने याची चाचपणी सुद्धा सुरु केल्याचं बोललं जातय. दरम्यान यासंदर्भात आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं भाष्य केलं आहे.
तब्येतीच्या कारणामुळे महिनाभरानंतर नाशिक दौऱ्यावर आलेले मंत्री छगन भुजबळ यांनी विविध राजकीय विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री भुजबळ म्हणाले, शरद पवार एनडीएमध्ये येतील असे मला अजिबात वाटत नाही असे छगन भुजबळांनी म्हटले आहे. मला किंचितही तसे वाटत नाही असे म्हणत भुजबळांनी ही शक्यता फेटाळली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात झालेल्या भेटीबाबतही त्यांनी ती केवळ शिष्टाचाराची भेट असल्याचे सूचित केले. सीमावादाच्या संदर्भात बैठक होती, त्यासाठी पवार साहेब आले होते. बसायला जवळचे ऑफिस कुठे आहे, जिथे कार्यकर्ते -आमदार भेटू शकतील म्हणून ते तिथे बसायला गेले एवढाच त्याचा अर्थ आहे. पवार साहेब दोन-तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. देशातही मंत्री होते. त्यामुळे प्रत्येक ऑफिस त्यांच्यासाठी निश्चितपणे रेड कार्पेट टाकण्यासाठी तयार असतं, त्यात चुकीचं काही नाही. त्याचा अर्थ ते इकडे जाणार तिकडे जाणार असं होत नाही असं भुजबळ म्हणाले.
म्हणून खैरेंवर जबाबदारी
दरम्यान, मागच्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर बोलताना, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या निधनानंतर दिलीप खैरे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत, त्यांच्या संघटन कौशल्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकल्याचे भुजबळ म्हणाले.
ठेकेदारांना सल्ला
नाशिकमधील पावसाळी परिस्थितीबाबत भुजबळांनी भाष्य केलं. शहरातील रस्त्यांची कामे नियमांनुसार व्हावीत. ठेकेदारांनी निष्काळजीपणा करू नये आणि वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस केंद्रात गेल्यानंतर राज्यात बावनकुळे मुख्यमंत्री होतील असं म्हटलं होतं. त्यावर पत्रकारांनी विचारले असता, मी ज्योतिषी नाही," असे म्हणत भुजबळांनी टोला लगावला. भाजपचे निर्णय केंद्रातून होतात त्याची काळजी आपल्याला करण्याचे कारण नाही असं भुजबळ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.