Sharad Pawar News : शिंदेंनी पक्ष फोडला पण शिवसैनिक ठाकरेंसोबत; शरद पवारांना विश्वास!

Sharad Pawar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी असे म्हणत आहे. या मुद्यावर शरद पवार यांनी एका वाक्यात नरेंद्र मोदी यांना फटकारले आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar News Sarkarnama

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. तिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत आहेत. या जागेसाठी दोन्ही शिवसेनेमध्ये अटीतटीची लढत निर्माण झाली आहे. ही जागा खेचून आणण्यासाठी दोन्ही शिवसेनेकडून संपूर्ण राजकीय ताकद खर्ची करण्यात येत आहे. यातच शरद पवार यांनी शिवसैनिका कोणाबरोबर? यावर मोठे विधान केले आहे. (Lok Sabha Election 2024)

Sharad Pawar News
Sharad Pawar Vs Raj Thackeray : शरद पवारांकडून राज ठाकरेंच्या राजकीय अस्तित्त्वावरच प्रशचिन्ह

शरद पवार यांची आज सकाळी पत्रकार परिषद झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील रोड-शो आणि त्यानंतर मुंबईकरांचे झालेल्या गैरसोयीवर भाष्य केले. मुंबईत रोड-शो घेणे हे शहाणपणाचं लक्षण नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी असे म्हणत आहे. या मुद्यावर शरद पवार यांनी एका वाक्यात नरेंद्र मोदी यांना फटकारले आहे. त्यांच्याकडे मुद्देच राहिले नाही. त्यामुळे त्यांची भाषा बदलली आहे, असे शरद पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar News
Sharad Pawar on Modi : नाशिकचं पाणी शरद पवारांनी पेटवलं; पंतप्रधानांची कोंडी

शरद पवार म्हणाले, "शिवसेना छोटा पक्ष नाही. त्यांची महाराष्ट्रात मोठी शक्ती आहे. विधानसभेत गेल्या पंचवार्षिकला तो एक नंबरचा पक्ष होता. सर्वाधिक त्यांच्या जागा होत्या. शिवसेनेचे 58, राष्ट्रवादीचे 52आणि काँग्रेसच्या 45 जागा होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणणे म्हणजे, त्यांना बोलायला दुसरे काहीच नाही, असे म्हणणे योग्य ठरेल. नकली शिवसेना म्हणजे? आज शिवसैनिक कोणाबरोबर आहे. शिवसेना पक्ष फुटला, शिंदेंनी वेगळा विवाह केला. तरी महाराष्ट्रात तुम्ही कुठेही गेला तरी, शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

शिवसेना पक्ष फुटल्यानंतर नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अस्तित्वाची लढाई आहे. या जागेसाठी शिवसेना ठाकरे पक्षासह महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षांनी संपूर्ण ताकद शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार सचिन वाजे यांच्यामागे उभी केली आहे. त्यामुळे येथील शिवसैनिक कोणामागे, या निवडणुकीत स्पष्ट होईल.

Sharad Pawar News
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !
Sharad Pawar News
Pune BJP News : 'सबका हिसाब होगा'; भाजप पदाधिकाऱ्यांच्या कामाचं होणार पोस्टमार्टेम ...

गांधी टोपी घालून काँग्रेसला लक्ष्य....

नाशिक येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra ModI) सभा झाली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी गांधी टोपी घालून भाषण केला. काँग्रेसवर हल्ला चढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचा मुद्दा आवळला होता. प्रभू श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणाला ठोकर मारली. काँग्रेसचे लोक मंदिरावरून वेडेवाकडे बोलतात. वीर सावरकरांना शिव्या देतात. राज्यातील स्वाभिमानी जनता पाहत आहे. काँग्रेस पुढे गुडघे टेकणाऱ्या नकली शिवसेनेला शिक्षा देण्याचे महाराष्ट्राने ठरवले आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमधील सभेत बोलले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com