Sharad Pawar News : पवारांकडून मराठा आरक्षणावर राज्य सरकारची तर, धनगर आरक्षणावरून फडणवीसांची कोंडी

Sahrad Pawar On Maratha Reservation : शरद पवार यांनी मराठा आणि धनगर आरक्षणावर मोठे विधान केले आहे....
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation In Maharashtra Latest News : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अधिवेशनात मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या आरक्षणावर स्पष्ट भूमिका मांडली. हे करताना मराठा आरक्षणावरून वेळकाढूपणाच्या भूमिकेवर राज्य सरकारची कोंडी केली. तसेच धनगर समाजाची देवेंद्र फडणवीस यांनी कशी फसवणूक केली, याची देखील आठवण शरद पवार यांनी करून दिली. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार, असे वेळोवेळी सांगत आहे. पण राज्यकर्ते त्यावर वेळकाढूपणाची भूमिका साकारताना दिसत आहे. यात सरळ-सरळ Maratha समाजाची फसवणूक होत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

Sharad Pawar
Sharad Pawar On BJP : पवारांनी भाजपच्या हिटलरी नीतीची केली पोलखोल; कार्यकर्त्यांमध्ये भरला हुंकार

मराठा आरक्षणावर काय म्हणाले पवार?

शरद पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने आरक्षणाविषयी जाहीर भूमिका घेतली होती. जाहीरनामामध्ये देखील आरक्षणाचा उल्लेख आहे. मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाच्या आरक्षण द्यायचे. या सर्व घटकातील तरुण पिढीला आरक्षणाच्या माध्यमातून मदत करण्याची गरज आहे. यासाठी आरक्षण गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून आरक्षणाची मागणी सतत होत आहे. तसा निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करत असताना अन्य ओबीसीचे घटक आहेत, त्या घटकांच्या मुलभूत हक्कांना धक्का लागता काम नये. कोणाच्या ताटातील काढून कोणाला देणे, हे योग्य नाही, यावर आम्ही ठाम आहोत. परंतु आजच्या राज्यकर्त्यांनी ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु त्यात वेळकाढूपणा केला जात आहे".

माझी आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली होती. त्यात जरांगे पाटील याने सांगितले की, सरकारशी बोलणे चालू आहे. राज्य सरकारने त्यांना लेखी स्वरुपात मागण्या मान्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांना तसे लिहून दिले आहे. या आरक्षणाचा लाभ तुमच्या सख्या-सोयऱ्यांसह सगळ्यांना मिळेल, अशी भूमिका लिखित स्वरूपात मान्य केली आणि आज त्यापासून वेगळी भूमिका राज्यकर्त्यांनी घेतली आहे. त्याचा परिणाम आज ही तरुण मुले अस्वस्थ आहेत. आज या तरुणांना आपली फसवणूक झाल्यासारखे वाटते आहे. चार-आठ दिवसात राज्य सरकार या संदर्भात निकाल घेणार आहे, असे सांगितले जात आहे. उद्याच्या २४ तारखेपूर्वी आम्ही आरक्षण देतो, अशी भूमिका मुख्यमंत्री घेत आहेत आणि त्यांचाच दुसरा सहकारी सांगतो, आम्ही आरक्षणावर एक वर्षापर्यंत भूमिका घेऊ शकत नाही. याचाच अर्थ असा होतो की, सरळ-सरळ फसवणूक होत आहे, असे शरद पवार म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'फडणवीसांनी केली धनगर समाजाची फसवणूक'

बारामती मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊन धनगर समाजाला शब्द दिला होता. सरकार येताच पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षण देतो, अशी घोषणा केली होती. त्या घोषणाला आज नऊ वर्षे झाली. त्याची पूर्तता आजही केलेली नाही. यात धनगर समाजाची फसवणूक केल्याची आठवण शरद पवार यांनी यावेळी करून दिली. तसेच आमचे सरकार होते, त्यावेळी आम्ही काही निर्णय घेतले होते. मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. दारिद्र्यातील समाजात मुस्लिमांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला होता. परंतु सरकार बदलले गेले आणि भाजपचे सरकार आले. हा निर्णय रद्द झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

edited by sachin fulpagare

Sharad Pawar
Amol Kolhe : 'मान खाली घालून गद्दारांबरोबर जाणं मनाला पटलं नाही, त्यामुळं...' ; अमोल कोल्हे थेट बोलले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com