Shirsat V/S Sattar News : सत्तार यांनी माझ्यासह बोरणारे, संजना जाधव यांच्याविरोधात काम केले!

Sanjay Shirsat's allegation, Sattar will lose Shinde's trust - Shiv Sena-Chhatrapati Sambhajinagar-Marathwada : सत्तार यांनी शिरसाट यांना डिवचल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत सत्तार यांनी कसे पक्षाच्या विरोधातच काम केले याचा भांडाफोड केला आहे.
Sanjay Shirsat-Abdul Sattar News
Sanjay Shirsat-Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे माजीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात महायुती असताना भाजपचे उमेदवार तत्कालीन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप आहे. यातच आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप करत विधानसभा निवडणुकीत त्यांनी माझ्यासह वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरणारे, कन्नड च्या संजना जाधव यांच्या विरोधात काम केल्याचे म्हटले आहे.

एक जानेवारी रोजी माजीमंत्री अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगरात आपला वाढदिवस साजरा करत मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी (Sanjay Shirsat) संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला होता. 'सिल्लोड मध्ये तुम्ही काय येता, मीच संभाजीनगरला तुमची गुंडगिरी संपवायला येणार आहे' असा इशारा सत्तार यांनी दिला होता. त्यानंतर संजय शिरसाट यांनी आज अब्दुल सत्तार यांच्यावर पलटवार केला.

Sanjay Shirsat-Abdul Sattar News
Abdul Sattar News : ना धनुष्यबाण, ना भगवा झेंडा; अब्दुल सत्तार प्रासंगिक करार मोडण्याच्या दिशेने!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेचे नेतृत्व कोण करणार? यावरून सध्या मंत्री संजय शिरसाट आणि माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. पालकमंत्री हेच जिल्ह्याचे नेतृत्व करतात असे सांगत शिरसाट यांनी आपणच जिल्ह्याचे नेते असल्याचे सत्तार यांना ठणकावून सांगितले. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी या वादात उडी घेत जिल्ह्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे हेच करतील, असे सांगत सावध भूमिका घेतली आहे.

Sanjay Shirsat-Abdul Sattar News
Shivsena UBT News : बाळासाहेब ठाकरेंच्या आवडत्या संभाजीनगरात शिवसेनेची वाताहत! नेते बघ्याच्या भूमिकेत

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगर मध्ये अभिष्टचिंतन सोहळा घेत सर्व पक्षात आपली ताकद असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जोपर्यंत आपल्यावर विश्वास आहे, तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत असल्याचे सांगत आपण जिल्ह्यात इतर कोणाला जुमानत नाही हे सत्तार यांनी सुचित केले.

Sanjay Shirsat-Abdul Sattar News
Shivsena Eknath Shinde: उत्साह वाढलेली शिंदेंची शिवसेना म्हणते, ठाकरे समर्थकांना ‘नो एन्ट्री’

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट काम करत असले तरी या दोघांमध्ये प्रचंड मतभेद असल्याचे वारंवार दिसून आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात संजय शिरसाट यांना संधी न मिळण्यामागे अब्दुल सत्तार हेच होते, असा आरोप सातत्याने शिरसाट आणि त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. या वादाची धग संजय शिरसाट मंत्री झाल्यानंतर कायम असून त्यात आणखी वाढ झाल्याचे दिसत आहे.

Sanjay Shirsat-Abdul Sattar News
Sanjay Shirsat News : वसतीगृहाची दुरावस्था पाहून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट भडकले!

सत्तार यांनी शिरसाट यांना डिवचल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत सत्तार यांनी कसे पक्षाच्या विरोधातच काम केले याचा भांडाफोड केला आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात संजय शिरसाट यांची अडचण करण्यासाठीच अब्दुल सत्तार यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना हाताशी धरत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजू शिंदे यांना मदत होईल, अशी भूमिका घेतली होती.

Sanjay Shirsat-Abdul Sattar News
Shivsena Vs BJP : भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या जागांवरही शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, पुण्यात जागावाटपावरून नवा वाद?

एमआयएम कडून अरुण बोर्डे हे पश्चिम मधून निवडणूक लढण्यास इच्छुक असताना सत्तार यांनीच इम्तियाज जलील यांना सांगून पश्चिम मध्ये उमेदवारच दिला नव्हता, अशी चर्चा त्यावेळी होती. शिरसाट यांच्या आरोपाने त्याला आता पुष्टी मिळाली आहे. एकूणच संभाजीनगर जिल्ह्यात मंत्री संजय शिरसाट विरुद्ध माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत जाणार, असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com