Teachers Constituency 2024 : आमदार किशोर दराडे यांच्या पापाला शिक्षकच चोख उत्तर देतील!

Vivek Kolhe teachers are educated and smart Teachers constituency 2024 : विवेक कोल्हे यांनी शिंदे गटाचे उमेदवार आमदार दराडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Kishor Darade On Vivek Kolhe
Kishor Darade On Vivek Kolhesarkarnama

Vivek Kolhe Vs kishor Darade Politics : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आता चांगलाच रंग भरला आहे. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी शिंदे गटाचे उमेदवार आमदार दराडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत.

यासंदर्भात पक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी आमदार दराडे यांच्या संदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मी कोणताही डमी उमेदवार उभा केलेला नाही. 17 एकर जमीन लाटली. डमी उमेदवाराला पंधरा लाख रुपये दिले. असा आरोप दराडे यांनी केला आहे, हे आरोप दराडे यांनी माझे नाव घेऊन करून दाखवावे, असे आव्हान त्यांनी आमदार दराडे यांना दिले.

आमदार दराडे यांनी मात्र त्यांच्या संस्थेतील कोल्हे नामक कर्मचाऱ्यांना उमेदवार म्हणून उभे केले आहे. त्यांनी मतदार यादीतही गोंधळ केला आहे. ते शिक्षकांना अडाणी समजतात त्यांच्या या बापाला शिक्षकच उत्तर देतील. यानिमित्ताने आमदार दराडे यांना कोल्हे यांनी थेट आव्हान दिले आहे.

Kishor Darade On Vivek Kolhe
Teachers Constituency 2024 : धक्कादायक! मतदानासाठी शेतमजूरही झाले शिक्षक?

कोल्हे म्हणाले, दराडे (Kishor Darade) यांनी माझे नाव घेऊन आरोप करून दाखवावा, असे आव्हान त्यांनी दिले. ते म्हणाले, माझे नाव घेऊन आरोप केल्यास मी तात्काळ अब्रू नुकसानीचा दावा दाखल करीन. "बाप दाखवा अन्यथा श्राद्ध करा" ही आपली भूमिका आहे.

माझी कटिबद्धता शिक्षकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आहे. त्यामुळेच मी अपक्ष उमेदवार झालो आहे. गरज पडली तर सरकारशी संघर्ष करू. काही प्रश्नांवर सरकारशी समन्वय ठेवावा लागेल. या भूमिकेतून माझी उमेदवारी असल्याचे कोल्हे म्हणाले.

Kishor Darade On Vivek Kolhe
Nashik Teachers Legislative elections : संस्थाचालकांना आमदारकी मिरवण्यासाठी हवी; गृहमंत्रालयाच्या हस्तक्षेपावर 'TDF'ची आगपाखड

'टीडीएफ'चा पाठिंबा मलाच

या मतदारसंघात 'टीडीएफ' संघटनेचे मोठे वर्चस्व आहे. ही संघटना ज्या उमेदवाराच्या मागे उभी राहते, तो उमेदवार निवडून येतो असा इतिहास आहे. यंदा संयुक्त टीडीएफ माझ्या पाठीशी उभी आहे. प्रत्येक ठिकाणी हे संघटन मला पाठिंबा देत आहे. त्यामुळे आपला विषय निश्चित आहे. त्यामुळेच प्रतिस्पर्धी उमेदवार अस्वस्थ झाल्याचा दावा कोल्हे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com