Sadashiv Lokhande : कारखानदारांची आपापसात जिरवाजिरवी, सदाशिव लोखंडे म्हणाले, 'मला भोवली'!

Shirdi Lok Sabha Election News : उद्धव ठाकरे यांनी संवाद दौरा साधाताना शिर्डीत अनुभवी भासाहेब वाकचौरे यांना हेरले. लोकसभा निवडणुकीत वाकचौरे यांना लोखंडेसमोर सामन्यासाठी उभी केले. परिणामी 50 हजार मतांनी सदाशिव लोखंडे यांचा पराभव झाला.
sadashiv lokhande
sadashiv lokhandesarkarnama

Shirdi Political News : मतदारसंघात नाॅट रिचेबल असलेले शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी पराभवाचे खापर मतदारसंघातील कारखानदारांवर फोडले आहे. 'कारखानदारांच्या आपापसातील जिरवाजिरवीत माझे नुकसान झाले. महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी प्रामाणिकपणे काम केले. परंतु मीच कमी पडलो', असेही सदाशिव लोखंडे यांनी म्हटले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे शिवसेनाविरुद्ध शिंदे शिवसेना (Shiv Sena), असा सामना रंगला. पक्षफुटीनंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदे गटाची साथ दिली. उद्धव ठाकरे यांनी संवाद दौरा साधाताना शिर्डीत अनुभवी भासाहेब वाकचौरे यांना हेरले. लोकसभा निवडणुकीत वाकचौरे यांना लोखंडेसमोर सामन्यासाठी उभी केले. परिणामी 50 हजार मतांनी सदाशिव लोखंडे यांचा पराभव झाला. लोखंडे यांच्या पराभवाबरोबरच त्यांची हॅटट्रिक देखील हुकली.

सदाशिव लोखंडे यांनी या पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेत कमी पडल्याचो कबुली दिली. तसेच कारखानदारांच्या आपापसातील जिरवाजिरवीत अडचणी निर्माण निर्माण होऊन पराभवाला सामोरे जावे लागले. महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी प्रामाणिकपणे कामे केली. राजकीय जीवनात अनेक पराभव बिघतलेत. मात्र हा पराभव काहीसा वेगळाच आहे. तिसऱ्यांदा खासदारकी संधी हुकवणारा हा पराभव आहे. मतदारसंघात खूप काही कामे केली. परंतु ती कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात कमी पडल्याचे सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

sadashiv lokhande
Shirdi Lok Sabha Elections 2024 Winner : 'कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या'; निष्ठावंतांनो तुम्ही 'खासदारकी' घ्या!

महायुतीचे नेते शिर्डीत एकत्र होते. पण मतदारांनी ऐकले नाही. त्यामुळे मला माझा पराभव स्वीकाराला लागतोय असे सांगून निवडून आलेल्या उमेदवाराने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, अशा शुभेच्छा लोखंडे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना दिल्या. जेंव्हा जिंकलो, तेव्हा माजलो नाही. पण शिर्डीकरांसाठी कार्यरत राहणार, असेही लोखंडे यांनी सांगितले. कांदा निर्यात बंदीचा फटका बसला असे म्हणता येणार नाही. पण नाफेडमार्फत कांदा खरेदी करून शेतकऱ्यांचा रोष कमी करता आला असता, असेही लोखंडे यांनी म्हटले.

sadashiv lokhande
Rajendra Phalke On Radhakrishna Vikhe : बुंदीचे लाडू वाटले, 'राष्ट्रवादी'ने विखेंच्या पराभवावर मीठ चोळले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com