Amol Khatal : राजकारण शिकवू नका! दिवाळीनंतर डावपेच दाखवून देईन; अमोल खताळांचा थोरात-तांबेंना इशारा

Sangamner MLA Amol Khatal targets Balasaheb Thorat and Satyajit Tambe without naming them, warning of political moves after Diwali : संगमनेरमध्ये शिव वाहतूक सेनेच्या उद्घाटनावेळी आमदार अमोल खताळांचा आक्रमक पवित्रा; बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांचे नाव न घेता साधला निशाणा.
Sangamner MLA Amol Khatal
Sangamner MLA Amol KhatalSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangamner Politics : "मला राजकारण कळत नाही, असा काहींचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. मला राजकारण शिकवण्याच्या फंदात कोणीही पडू नका.

राजकारणाचे डावपेच कसे खेळायचे असतात, हे दाखवून देईल. दिवाळीनंतर डावपेच काय आहे हे मी तुम्हाला दाखवून देईल", असा घणाघात एकनाथ शिंदे शिवसेनेचे संगमनेरमधील आमदार अमोल खताळ यांनी मामा-भाचे, अर्थातच काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे नाव न घेता केला.

संगमनेर (Sangamner) शहरातील अकोले नाका परिसरात शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते झाले. शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, विभागप्रमुख बाळासाहेब जगदाळे, आरपीआयचे शहरप्रमुख कैलास कासार आदी उपस्थित होते.

शिवसेनेचे (Shivsena) आमदार खताळ म्हणाले, "संगमनेर नगरपालिका निवडणुकीत यश मिळाले म्हणून विरोधकांनी हुरळून जाऊ नये. तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करण्याचे काम करतात; मात्र आमचे कार्यकर्ते नगरसेवक नसले, तरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून जनसेवक म्हणून काम करत आहे. शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना कोणी धमकावण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही."

Sangamner MLA Amol Khatal
Amol Khatal : महिलांची तक्रार अन् आमदार खताळ थेट दारू अड्ड्यावर! जनावरांच्या चाऱ्याखाली लपवला होता अवैध दारूसाठा

तुमच्या नातेवाईकांचे दवाखाने सुरू राहावे, म्हणून तुम्ही नगरपालिकेचे कॉटेज रुग्णालय बंद पाडले आहे. त्यामुळे आपण घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये 100 खाटांचे केवळ महिला व लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. लवकरच आरोग्यमंत्री संगमनेरमध्ये येऊन येथील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचलणार आहे, असेही आमदार खताळ यांनी सांगितले.

Sangamner MLA Amol Khatal
Ahilyanagar DCC Bank : अजितदादा असते तर जिल्हा बँकेची निवडणूकच झाली नसती! सीताराम गायकरांचा मोठा दावा

एकनाथ शिंदे शिवसेना म्हणजे, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करणारा आमचा पक्ष नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी चोवीस तास कार्यरत राहणे, हेच आमचे ध्येय आहे. सामान्य कार्यकर्त्याला जनतेने संधी दिल्यामुळेच आज मी आमदार झालो आहे. शिववाहतूक सेनेच्या स्थापनेच्या निमित्ताने रिक्षाचालकांना संघटीत करून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही आमदार खताळ यांनी सांगितले.

गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक!

संगमनेर शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात आणि शहरातील प्रत्येक उपनगरात ‘गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक’ हा उपक्रम राबवून शिवसेनेच्या शाखा सुरू करण्याचा निर्धार आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लोकशाही मार्गाने लढविल्या जातील. शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता देखील निवडणुकीच्या मैदानात उतरेल. बिनविरोध निवडणुकांच्या राजकारणावरून विरोधकांना लक्ष्य करताना, यापुढे संगमनेर तालुक्यात कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असाही इशारा आमदार खताळ यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.