Shivsena on Drugs : ड्रग्जविरोधात शिवसेना नाशिकमध्ये कधी नव्हती एवढी आक्रमक!

Shivsena has never been so aggressive against state Government-उद्याच्या मोर्चासाठी शिवसेनेने शहरातील सर्व महाविद्यालये पिंजून काढल्याने यंत्रणा अलर्ट
Shivsena on Drugs issue
Shivsena on Drugs issueSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Nashik News : शहरातील भावी पिढीला अमली पदार्थांच्या संकटातून वाचविण्यासह या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शिवसेना उद्या (ता. २०) शहरात शक्तिप्रदर्शन करणार आहे. यामागे त्यांचा खरा उद्देश सत्ताधारी शिवसेनेच्या शिंदे गटाला राजकीय धक्का देण्याचा असल्याने या मोर्चाविषयी सर्व पदाधिकारी रात्रीचा दिवस करीत आहेत. (All Shivsena Office bearers are taking heavy efforts for Morcha)

नाशिक (Nashik) शहरात मुंबई (Mumbai) पोलिसांनी (Police) ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला. त्यानंतर मोठे रॅकेट उघडकीस आले. त्यात थेट राजकीय नेत्यांचा (Shivsena) देखील यातील आरोपींशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे.

Shivsena on Drugs issue
Maratha Reservation News : मराठा तरुणांनो टोकाचे पाऊल उचलू नका..

यासंदर्भात शिवसेनेने शहरातील सर्व भागात व सर्व पदाधिकारी, शाखांना सक्रिय केले आहे. यासंदर्भात थेट पक्षाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी शहराचा दौरा करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला होता. त्यामुळे उद्याच्या मोर्चाची शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. प्रशासन आणि विशेषतः पोलिस याबाबत अतिशय अलर्ट मोडवर आहेत.

याबाबत शिवसेनेचे माजी आमदार वसंत गिते म्हणाले, अलीकडच्या वर्षात, अमली पदार्थांचे व्यसन ही एक वाढती चिंता बनली आहे, ज्यामुळे आपल्या तरुणांचे जीवन आणि भविष्य धोक्यात आले आहे, या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नाशिकमध्ये शिवसेनेचा उद्याचा मोर्चा होणार आहे.

अमली पदार्थांच्या दुरुपयोगाच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आपल्या समाजातून ड्रगमाफियांच्या रॅकेटचे उच्चाटन करण्यासाठी नाशिककरांना, पालकांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. त्यासाठी हीच योग्य वेळ असून, त्यासाठी सर्वांनी सक्रिय होऊन शहराला वाचविले पाहिजे.

Shivsena on Drugs issue
Eknath Khadse News : एकनाथ खडसे कुटुंबीयांना तब्बल १३७ कोटींचा दंड?

शिवसेनेने (ठाकरे गट) शहरातील हा मोर्चा जाहीर केल्यावर अन्य राजकीय पक्षदेखील जागे झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधकांबरोबरच सत्ताधारी शिंदे गटदेखील सावध झाला आहे. याबाबत सातत्याने सत्ताधारी राजकीय पक्षांवर आरोप होत असल्याने पालकमंत्र्यांनीदेखील कारवाईला गती देण्यासाठी बैठक घेतली. सर्वच घटक सक्रिय असले तरीही शिवसेना मात्र आपली संघटनात्मक पकड मजबूत करण्यासाठी या मोर्चाद्वारे विशेष जोर लावून राज्य सरकारला हादरा देण्याच्या तयारीत आहे.

Shivsena on Drugs issue
Congress Nashik News : नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात काँग्रेसचे पुढचे पाऊल काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com