Nashik Loksabha : ठाकरे गट नाशिकवर दावा ठोकणार; पण उमेदवार कोण असणार ?

Shivsena Political News : नाशिकचे दोन टर्म आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik News: महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने राज्यात लोकसभेच्या 23 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये नाशिकचा समावेश आहे. या निर्णयाने इच्छुकांमध्ये उत्साह वाढला असून ठाकरे गट उमेदवार देणार यावर शिक्कामोर्तब झाले. नुकत्याच झालेल्या बैठकीत खासदार संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली.

नाशिकचे दोन टर्म आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यांनी बंडखोरी केल्याने नाशिक मतदारसंघातून कोणता पक्ष उमेदवार देणार, याची चर्चा होती. त्यावर शिवसेना ठाकरे गट याबाबत ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Uddhav Thackeray
Chandrapur News : नागपुरातील महारॅलीसाठी कार्यकर्ते म्हणाले, 'है तय्यार हम...'

ठाकरे गटाने या मतदारसंघावर आपला दावा कायम ठेवत नुकतीच नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली आहे. वंचित बहुजन आघाडी,शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस असे चार पक्ष या निवडणुकीत महायुतीला आव्हान देतील. महायुतीचा उमेदवार कोण? हे अद्याप स्पष्ट नाही. शिंदे गट विद्यमान खासदार गोडसे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असेल का? आणि भाजपची (BJP) मतदारसंघात सुरू असलेली जोरदार बांधणी याचा विचार केल्यास महायुती आत्मविश्वासाने निवडणुकीत उतरेल असे चित्र आहे.

महायुतीत नाशिकची जागा कोणाला हा प्रश्न अनुत्तरीत असल्याने लोकसभा निवडणुकीतील राजकारण कोणत्या दिशेला वळेल हे सांगता येत नाही. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. मात्र अधिक प्रभावी उमेदवाराचा देखील शोध ठाकरे गटाकडून सुरू असल्याचे कळते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात एका शिक्षण संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे आणि अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) अशा दोघांकडे उमेदवार म्हणून पाहिले जाते. त्यासाठी काही स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या उमेदवारांना पक्षात प्रवेश देण्यासाठी अतिशय जोरात हालचाली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये शिवसेनेचा उमेदवार असणार हे स्पष्ट झाले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Uddhav Thackeray
Nashik Political News : बडगुजर यांच्या हकालपट्टीवरुन लक्ष्मण सावजी यांची संजय राऊतांवर टीका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com