Nashik Shivsena News : भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची धूमधडाक्यात `होऊ द्या चर्चा`

Shivsena`s power demonstraton in BJP`s voters base-भाजपच्या राज्य व केंद्रातील सरकारबाबत नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत संताप व्यक्त केला.
Shivsena programme at Nashik
Shivsena programme at NashikSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : भारतीय जनता पक्षाने नऊ वर्षे महागाई वाढवून जनतेला नागवले. गरिबांचे जगणे मुश्कील करीत त्या धोरणाचे समर्थन केले. आता निवडणुका जवळ आल्यावर स्वयंपाकाच्या गॅसचे दर दोनशे रुपयांनी कमी केले, यातून जनतेचे शोषण केल्याची कबुलीच भाजपने दिली आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. (Nashik city citizens unhappy with BJP`s policy on inflation and religious conflitct)

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटातर्फे (Uddhav Thackeray) ‘होऊ द्या चर्चा’ उपक्रम काल भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेल्या इंदिरानगर (Nashik) भागात झाला. त्याला युवकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली. या वेळी सरकारच्या राजकीय फोडाफोडीविषयी नागरिकांनी संताप व्यक्त केला.

Shivsena programme at Nashik
NDCC Bank News : ३४७ कोटींच्या घोटाळ्यात न्यायालयाने सहकारमंत्र्यांचे कान टोचले!

नासर्डी ते पाथर्डी या भाजपच्या तथाकथित बालेकिल्ल्यात गुरुवारी शिवसेना ठाकरे गटातर्फे ठिकठिकाणी ‘चला होऊ द्या चर्चा’च्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यात आले. नेहमीच सडेतोड भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, वासननगर प्रशांतनगर आदी भागातील नागरिकांनी महागाई, बेरोजगारी, गुंडगिरी आदीविषयी राज्य आणि केंद्र सरकारबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.

या वेळी जॉगिंग ट्रॅक, वडाळा गाव, रथचक्र चौक, तर पाथर्डी फाटा भागात वासननगर येथील गामणे मैदान आणि प्रशांतनगर येथे झालेल्या उपक्रमात नागरिकांनी विशेषतः महिलांनी जनधन योजना, सिलिंडरच्या किमती, ऐन सणाच्या तोंडावर वाढलेले किराणा मालाचे भाव, याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करीत भाजपच्या कारभारावर कोरडे ओढले. हा भाजपला मोठा इशाराच मानला जातो.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेदेखील गांभीर्याने बघितले जात नसल्याचे भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले. शिक्षणाचे होणारे खासगीकरण चिंताजनक असल्याची भूमिका युवकांनी मांडली. राज्य सरकार फक्त आपापसांतील मतभेद जपण्यात, तर केंद्र सरकारने संपूर्ण राज्याला वाऱ्यावर सोडून दिले आहे, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

Shivsena programme at Nashik
Malegaon News : गटारीच्या निविदेत पुन्हा भ्रष्टाचाराची दुर्गंधी!

महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, लोकसभा संघटक संगीता खोदान, उपमहानगरप्रमुख नीलेश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागप्रमुख तथा संयोजक रवींद्र गामणे व दीपक केदार यांनी स्वागत केले. या वेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट, त्र्यंबक कोंबडे, शारदा दोंदे, सुभाष गायधनी, नाना पाटील, उपविभागप्रमुख मदन डेमसे, धनंजय गवळी, दादा मेढे, दीपक केदार, किरण आहेर, संगीता गोस्वामी आदी उपस्थित होते. तर इंदिरानगर भागात मध्य विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब कोकणे, महानगर संघटक सचिन बांडे आदी उपस्थित होते.

Shivsena programme at Nashik
Manoj Jarange News : खुर्ची गेली तरी मुख्यमंत्री मागेपुढे पाहणार नाहीत, आरक्षण देतीलच; जरांगेंना ठाम विश्वास

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com