Kukadi Sugar Factory seized : राहुल जगतापांना मोठा धक्का; कुकडी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्ती

Ahilyanagar District Bank takes action against Rahul Jagtap-led Kukadi factory : सुमारे 370 कोटींच्या थकबाकीप्रकरणी कारवाई; जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर सहकार क्षेत्रात मोठी घडामोड
Rahul Jagtap
Rahul JagtapSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar district cooperative bank : जिल्हा सहकारी बँक निवडणूक तोंडावर असतानाच, अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांना धक्का बसला आहे. राहुल जगताप यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेला कर्मवीर कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई केली.

माजी आमदार राहुल जगताप यांनी, कारखान्याच्या मदतीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. काही महिन्यातच कर्जप्रकरण मार्गी लागेल. तसेच जिल्हा बँकेकडे कर्जाचे हप्ते करून देण्याची मागणी केली जाणार असल्याचे सांगितले.

माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) हे श्रीगोंद्यातील कुकडी कारखान्याचे अध्यक्ष आहेत. यातच ते जिल्हा बँकेचे माजी संचालक आहे. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडे त्यांनी कारखान्यासाठी कर्जाची मागणी केली होती. त्यावेळी त्यांचा प्रस्ताव महायुती सरकारकडून फेटाळला गेला. राष्ट्रवादी फुटली, तेव्हा राहुल जगताप यांनी वेट अॅण्ड वाॅच करत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाबरोबर राहिले. पुढे ते सत्ताधारी महायुतीत सहभागी झालेले अजित पवार राष्ट्रवादी पक्षात सहभागी झाले.

कुकडी कारखान्याची परिस्थिती गेल्या तीन वर्षांपासून बिकट आहे. एकप्रकार बंद अवस्थेत आहे. कारखान्याने जिल्हा बँकेकडून (DCC Bank) सुमारे 350 कोटी रुपयांच्या कर्ज घेतले आहे. हे कर्ज थकले आहे. व्याजासह कर्जाची रक्कम जवळपास 370 कोटींवर पोहोचली आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने वारंवार जप्तीच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्याला मुदतवाढही दिली होती.

Rahul Jagtap
Bank Election Petition : जिल्हा बँक निवडणुकीला हायकोर्टात आव्हान; निवडणूक प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. निवडणुकीच्या हालचाली सुरू आहेत. प्रशासक राज सुरू आहे. विभागीय सहनिंबधक संगीता डोंगरे या बँकेचा कारभार पाहात आहेत. या प्रशासकीय राजवटीत कुकडीवर जप्तीची कारवाई झाली आहे. याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत दोन सहकारी कारखान्यांवर कर्जाच्या वसुलीपोटी जप्तीची कारवाई झाली.

Rahul Jagtap
Ahilyanagar DCC Bank Election : अमित शाह भेट, 'आणखी बरेच काही'ची पोस्ट अन् आता जिल्हा बँकेवर विवेक कोल्हेंचं मोठं वक्तव्य

पथकाकडून जप्तीची नोटीस

जिल्हा बँकेने सरव्यवस्थापक सुरेश पाटील यांना कारवाईसाठी प्राधिकृत केले होते. त्यांच्या पथकाने जप्तीच्या कारवाईची नोटीस कारखान्याच्या प्रवेशद्वारावर चिटकवली. जिल्हा बँकेने यापूर्वी राहुरीतील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना कर्ज व्याजासह सुमारे 150 कोटींच्या थकबाकी पोटी जप्त केला. आता या तनपुरे कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करून वसुली करण्याचा जिल्हा बँकेचा प्रयत्न आहे.

भाजप नेत्याचा असाही प्रयत्न

कुकडी कारखाना भाजपच्या एका नेत्याने भागीदारीत चालवण्याची तयारी दर्शवली होती. तशा चर्चा सुरू होत्या. जिल्हा बँक निवडणुकीतच या चर्चा सुरू झाल्याने हा मुद्दा खुप चर्चेत आला होता. जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई टाळावी, यासाठीही या नेत्याने प्रयत्न केले होते. त्यातूनच नोटीस बजावली गेली तरी मुदतवाढही दिली गेली. मात्र अखेर जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com