

Kumbh Mela News : सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्साहात पार पडत आहे. या सोहळ्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्रिमंडळातील सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यंदा प्रशासनाने विशेष काळजी घेत गेल्या कुंभमेळ्यातील चूक सुधारली असून, संभाव्य राजकीय वाद टाळला आहे.
२०१५ मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात मोठ्या राजकीय वादाची ठिणगी पेटली होती. त्यावेळी नाशिक महापालिकेत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) सत्ता होती, तर केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार होते.
ध्वजारोहणाचे नियोजन करताना प्रशासनाकडून महापालिकेला जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आल्याचा आरोप झाला होता. मनसेचे तत्कालीन महापौर अशोक मुर्तडक आणि उपमहापौर गुरमीत सिंग बग्गा यांना योग्य सन्मान देण्यात आला नव्हता. तसेच अनेक नगरसेवकांना कार्यक्रमाचे निमंत्रणही नव्हते. जे नगरसेवक सोहळ्याला उपस्थित राहिले, त्यांना पोलिसांनी व्यासपीठापासून दूर ठेवले. महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना मिळालेल्या या दुय्यम वागणुकीमुळे कार्यक्रमाला गालबोट लागले होते.
यंदा मात्र राजकीय परिस्थिती वेगळी आहे. केंद्रापासून ते महापालिकेपर्यंत सत्ता संतुलनामुळे प्रशासकीय विसंवाद टळला आहे. ध्वजारोहणाच्या तयारीत नाशिक महापालिकेचा आणि स्थानिक नगरसेवकांचा सक्रिय सहभाग घेण्यात आला आहे.
महापौरांसह नगरसेवकांनी शहरभर स्वागताचे फलक लावले असून प्रशासनाकडून कार्यकर्त्यांसाठी मुबलक पासेसचे वाटप करण्यात आले आहे. मागील वेळचा कटू अनुभव पाहाता, यंदा लोकप्रतिनिधींना योग्य मान-सन्मान देत प्रशासनाने समन्वय साधल्याने ध्वजारोहण सोहळा अतिशय उत्साहात आणि निर्विघ्नपणे पार पडत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.