

Kumbhmela News: सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण समारंभ येत्या 31 ऑक्टोबरला होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
रोहित संघाच्या ध्वजारोहण समारंभा नंतर कुंभमेळ्याला अधिकृत सुरुवात झाली असे मानले जाते. त्यामुळे रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त परिसरातील कामे प्राधान्य क्रमाने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांवर दबाव आहे. अधिकाऱ्यांकडून रोजच त्याचा आढावा घेतला जात आहे.
मात्र राज्यातील कंत्राटदारांचे 90 हजार कोटी रुपये थकीत आहेत. कामांचे थकीत पैसे मिळावे यासाठी राज्यभर कंत्राटदार शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. गेले चार वर्ष यासंदर्भात कंत्राटदारांमध्ये नैराश्याची स्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची वेगळीच समस्या निर्माण होण्याची चर्चा आहे. व मिळाल्यासाठी राज्य शासनाने ३५ हजार कोटी रुपयांच्या कामांची घोषणा केली आहे. यातील बहुतांश कामे नाशिक शहरात सुरू आहेत
कुंभमेळ्यांच्या कामांसाठी ४० टक्के निधी राज्य शासनाकडून तर ६० टक्के निधी केंद्र शासनाकडून मिळणार आहे. केंद्र शासनाने राज्य शासनानेचा निधी खर्च झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निधी देण्याचे त्वरण स्वीकारले आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या कामांबाबत केंद्र शासनाचा निधी मिळण्यात अडचणी नाहीत. राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होईल का? असा पेच कंत्राटदारांपुढे आहे.
त्यामुळे सध्या कुंभमेळ्याच्या कामांसाठी सरकारची घाई आहे. कंत्राटदार मात्र निधी मिळणार की नाही या चिंतेत आहेत. या गोंधळात कुंभमेळ्यांच्या कामांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.