Nashik Municipal Election : जागा वाटपावरून तणाव : भाजपकडून फारच कमी जागांची ऑफर, नाराज शिवसेनेचा पुढचा निर्णय कोणता?

Mahayuti alliance crisis : नाशिकमध्ये भाजकडून फारच कमी जागांची ऑफऱ शिवसेनेला दिली गेल्याचे समजते. पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी काय ते स्पष्ट होईल.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : आगामी कुंभमेळा नाशिकमध्ये होत असल्याने भाजपला नाशिक महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी भाजपने फार आधीच 'शंभर प्लसचा' नारा दिला आहे. त्यासाठी अन्य पक्षातील नेत्यांना गळाला लावत मोठे इनकमिंग भाजपने घडवून आणले.

भाजपच्या शंभर प्लसच्या घोषणेमुळे नाशिक महापालिका निवडणुकीसाठी महायुतीसंदर्भात अद्याप अनिश्चितता आहे. भाजपच्या 'एकला चलो रे च्या संकेतातून शिवसेना देखील आता सावध झाली असून स्वबळ अजमावण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मागच्या निवडणुकीत दोन नंबरची मते पडलेल्या उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. तसेच नियोजनबद्ध प्रचार करण्यासाठी पक्षाच्या वतीने वॉररुम तयार करण्याचे काम सुरु आहे.

महापालिका निवडणुकीत शिवसेनेने भाजपकडे सुरुवातीला ६० जागांची मागणी केली होती. परंतु, भाजपकडून या मागणीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर थोडे-फार इकडे करण्याचा निरोप देण्यात आल्यानंतरही भाजपने प्रतिसाद दिला नाही. भाजपकडून शिवसेनेला फक्त ३० जागांची ऑफर दिली जाण्याची शक्यता असल्याने शिवसेना नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde Politics: शिंदेंची शिवसेना झाली सावध, भाजप विरोधात दादा भुसे यांना बाजूला करीत घेतला मोठा निर्णय!

महायुतीत शिवसेनेला अधिक जागा हव्या असून भाजप त्या द्यायला तयार नाही. भाजपने सध्या तरी ८५ जागांवर निवडून येणारे उमेदवार निश्चित केले आहेत. साधरण त्यात ८० ते ८२ जागांवर भाजप, तीस जागा शिवसेनेला तर दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचा विचार भाजपचा आहे. शिवसेनेला ही ऑफर मान्य नसल्यास शिवसेनेला सोडून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती करण्याचा देखील विचार असल्याचे समजते.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Rajabhau Waje : खासदार वाजेंचा संयम सुटला, भाजपच्या उदय सांगळेंची केली पोलखोल..नको ते सगळच काढलं..

भाजपची भूमिका मान्य नसल्याने शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरु केली आहे. त्याचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. एकनाथ शिंदे स्वत: महापालिका निवडणुकीचा आढाव घेणार असून त्यावेळी शिवसेनेची भूमिका अधिक स्पष्ट होईल. भाजप सोबत युती झाली तर ठीक नाहीतर स्वबळाची तयारी ठेवण्याच्या सूचना फार आधीच शिवसेना नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com