Smart Meter Row : 5 हजारांहून थेट 20 हजार बील, शिंदेंच्या मंत्र्यानेच केली स्मार्ट मीटरची पोलखोल; अखेर महावितरणने दिलं स्पष्टीकरण

Gulabrao Patil on Smart Meter : स्मार्ट मीटर बसविल्याने विजेचे बिल वाढीव येते ही ग्राहकांची तक्रार आहे. अनेक नागरिकांनी याबाबत लोकप्रतिनिधी, आमदार आणि मंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे हा राजकीय वादाचा विषय बनला आहे.
Gulabrao Patil On Smart Meter
Gulabrao Patil On Smart Meter Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News, 30 Jul : राज्यात स्मार्ट मीटर हा वादाचा विषय बनला आहे. विधिमंडळात स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती नाही, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र जबरदस्तीने मीटर बसवल्याच्या तक्रारी आहेत.

स्मार्ट मीटर बसविल्याने विजेचे बिल वाढीव येते ही ग्राहकांची तक्रार आहे. अनेक नागरिकांनी याबाबत लोकप्रतिनिधी, आमदार आणि मंत्र्यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे हा राजकीय वादाचा विषय बनला आहे.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्मार्ट मीटरविरोधात राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. स्मार्ट मीटर ग्राहकांच्या संमतीशिवाय बसवू नये, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. त्यासाठी अनेक शहरांमध्ये सरकार विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.

राज्य सरकार स्मार्ट मीटरचे समर्थन करीत असतानाच जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्मार्ट मीटरची खिल्ली उडवली होती. आपल्याला पाच हजार रुपये बिल येत असताना स्मार्ट मीटरमुळे ते वीस हजार झाले असे विधान त्यांनी केले होते. खुद्दमंत्रांनीच स्मार्ट मीटरची पोलखोल केल्याने खळबळ उडाली.

Gulabrao Patil On Smart Meter
Gulabrao Patil: 'वीज नसली तर शेतकऱ्यांनी कळ सोसावी; उद्योगाची अडचण झाली तर सरकारची अडचण होते' : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने संताप

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्मार्ट मीटर विषयावर जनतेची बाजू घेतली. त्यामुळे महावितरणच्या प्रशासनातही एकच धावपळ उडाली. महावितरणच्या प्रशासनाने धावपळ करीत यावर खुलासा केला आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोणत्याही एका महिन्याचे बिल 20 हजार रुपये आलेले नाही, असा खुलासा करण्यात आला. त्यामध्ये प्रशासनाने शब्द चालाखी केल्याचे पुढे आले. गुलाबराव पाटील यांच्या घरावर सौर प्रकल्प बसविला आहे. त्यामुळे विजेचे बिल आपोआपच त्यातून वजा होते. ही वस्तुस्थिती मांडणे महावितरण जाणीवपूर्वक विसरले की काय? अशी स्थिती आहे.

Gulabrao Patil On Smart Meter
Maharashtra Government : कडक कारवाईनंतर आता पदोन्नतीचा 'धमाका'; नोंदणी व मुद्रांक विभागातील 160 अधिकाऱ्यांना लॉटरी...

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्मार्ट मीटर बाबत केलेल्या विधानाचा बाण राज्य सरकार आणि महावितरणच्या जिव्हारी लागलेला दिसतो. विज कंपनीने तातडीने धावपळ करीत यावर खुलासा केला. मात्र त्यातून एक नवा राजकीयवाद उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचा स्मार्ट तीर सरकारच्या जिव्हारी लागला की काय? अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com