Maharashtra Government : कडक कारवाईनंतर आता पदोन्नतीचा 'धमाका'; नोंदणी व मुद्रांक विभागातील 160 अधिकाऱ्यांना लॉटरी...

Registration and Stamps Department, Maharashtra Registration Department, 160 officers promoted : महसूल विभागात कडक कारवाईनंतर नोंदणी व मुद्रांक संवर्गात अभूतपूर्व पदोन्नती; राज्यभरातील १६० अधिकाऱ्यांना एकाच वेळी बढती, दस्त नोंदणीला गती व पारदर्शकतेची हमी
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या महसूल विभागात प्रशासकीय चक्रे वेगाने फिरू लागली असून, नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर सुकर झाला आहे. दुय्यम निबंधक श्रेणी-१ आणि मुद्रांक निरीक्षक संवर्गातील तब्बल १६० अधिकाऱ्यांना सह जिल्हा निबंधक वर्ग-२ तसेच सह दुय्यम निबंधक वर्ग-२ आणि मुद्रांक उपअधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

शासनाने यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. या विभागाच्या इतिहासात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदोन्नती देण्याची ही पहिलीच वेळ असल्याने प्रशासकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे. आदेशानुसार, राज्यभरातील विविध विभागांतील अधिकाऱ्यांना ही बढती मिळाली आहे. यामध्ये कोकण विभागात ५९ अधिकारी, पुणे विभागात ४२ अधिकारी, नागपूर विभागात १९, छत्रपती संभाजीनगर विभागात १५, नाशिक विभागात १४ आणि अमरावती विभागातील ११ अधिकाऱ्याचा समावेश आहे.

दस्त नोंदणीला मिळणार गती

वरिष्ठ अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरल्यामुळे आता दुय्यम निबंधक कार्यालयांमधील दस्त नोंदणीचे कामकाज अधिक जलद आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. या पदोन्नतीमुळे खाली रिक्त झालेल्या स्तरांवरील जागाही तत्काळ भरण्याच्या सूचना पुणे येथील नोंदणी महानिरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. "प्रलंबित पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागल्याने प्रशासकीय कामकाजाला मोठी गती मिळेल. अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्यांमुळे दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांचा वेळ वाचेल आणि महसूल संकलनालाही गती येईल," असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule
Raghav Chadha news : दिल्लीत घमासान, सरकारला हादरा..! अचानक गायब झालेल्या राघव चड्ढा यांच्या भूमिकेने वाढले गुढ

प्रशासकीय पातळीवर प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या या पदोन्नती मुळे अधिकाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, महसूल यंत्रणेच्या एकूण कार्यक्षमतेवर याचा सकारात्मक परिणाम दिसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ​दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ७/१२ उताऱ्यांमधील फेरफार आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १५५ च्या गैरवापराप्रकरणी महसूल विभागातील १५ अधिकाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

Chandrashekhar Bawankule
Anti Paper Leak Bill : राहुल गांधींचे अर्धवट भाषण अन् PM मोदी-शहांच्या अनुपस्थितीत गाजला हायहोल्टेज मुद्दा; सरकारसाठी महत्वाचे विधेयक प्रचंड गोंधळात मंजूर

तसेच इतर ८४ महसूल अधिकारी प्रशासनाच्या रडारवर आल्याने महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. या धक्क्यानंतर आणि प्रशासनातील वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आता तब्बल १६० अधिकाऱ्यांना एकाच वेळी पदोन्नती देऊन महसूल विभागाने एका बाजूला कडक कारवाई आणि दुसऱ्या बाजूला पदोन्नतीचा समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय आणि प्रशासकीय गोटात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com