Shrirampur Political News : कानडे अन् ससाणेंमधील गटबाजी उफाळली

Nagar Politics : श्रीरामपूर काँग्रेसमध्ये करण ससाणे व आमदार लहू कानडे, असे दोन गट असून युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि सत्कार कार्यक्रम वेगवेगळे झाले.
Karan Sasane, Lahu Kanade
Karan Sasane, Lahu KanadeSarkarnama
Published on
Updated on

Nagar Politcs : राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची धुसफूस वाढली आहे. म्हणजेच महाविकास आघाडीत कुछ भी आलबेल नाही. यातच श्रीरामपूर काँग्रेसमध्ये करण ससाणे व आमदार लहू कानडे, असे दोन गट असल्याचे लपून राहिलेले नाही. आज युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या जशा निवडीही स्वतंत्र झाल्या, तसे सत्काराचे कार्यक्रमही वेगवेगळे झाले. यामुळे श्रीरामपूर काँग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आला आहे.

युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमाला करण ससाणे (Karan Sasane) यांच्याकडे युवक काँग्रेसचे प्रभारी सुनील नागरगोजे, तर आमदार कानडे यांच्याकडे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी हजेरी लावली. युवक काँग्रेसच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्त्या करण्यात आल्या. करण ससाणे गटाकडून 15, तर आमदार कानडे यांनी 22 नवीन शिलेदारांवर जबाबदारी दिली. या पदाधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांनी निवड केलेल्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार झाले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत ओगले, नगर जिल्हा प्रभारी सुनील नागरगोजे यांच्या उपस्थितीत युवक काँग्रेसची (Congress) आढावा बैठक पार पडली. या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नागरगोजे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Karan Sasane, Lahu Kanade
Hemant Godse : मुख्यमंत्री शिंदेंनी भेट टाळली, हेमंत गोडसेंचा मोठा निर्णय; छगन भुजबळांसह भाजपला इशारा

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे म्हणाले, "अनेकांनी माझे पद घालविण्याचा प्रयत्न केला. परंतु, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार कानडे यांच्यासारखे नेते जोपर्यंत पाठीशी आहेत, तोपर्यंत हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. युवकांच्या संघटनेसाठी मी ठामपणे उभा राहील. नगर जिल्ह्यात व राज्यात आमच्यासमोर काँग्रेसचे एकच नेतृत्व आहे ते म्हणजे माजी मंत्री थोरात!" (Balasaheb Thorat) श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्याला कानडे यांच्या रूपाने सुसंस्कृत व प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले आमदार लाभले आहेत. काँग्रेस पक्षाचा आमदार हाच तालुक्याचा प्रमुख आहे. त्यामुळे येथे कोणाला लुडबूड करण्याचा अधिकार नाही, असेही स्मितल वाबळे यांनी सांगितले.

जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी सुनील नागरगोजे यांनी म्हटले, "यवुक काँग्रेसमध्ये विधानसभा अध्यक्ष निर्णय प्रक्रियेत असतात. त्यानुसार सिद्धार्थ फंड यांनी बैठक बोलावली होती. त्यानुसार आपण हजेरी लावली. येथे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती व निवडीबाबत चर्चा झाली. श्रीरामपूर युवकच्या निवडीचा विषय राज्यापातळीपर्यंत गेला असून, त्यावर आज वरिष्ठांना अहवाल सादर करायचा आहे." तसेच कानडे यांच्या बैठकीबाबत आपल्याला कल्पना देण्यात आलेली नव्हती. तसेच जिल्हाध्यक्षांनीही संपर्क साधला नाही. आमचे जिल्हा दौरा होता, तो पुढील आठवड्यात होणार आहे, असेही सुनील नागरगोजे यांनी म्हटले.

नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसच्या सचिव दिपाली ससाणे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ फंड, शहराध्यक्ष रितेश चव्हाणके, उपाध्यक्ष शाहरुख शेख आदी उपस्थित होते. आमदार लहू कानडे यांच्या यशोधन या संपर्क कार्यालयातील बैठकीला आमदार कानडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, कार्लस साठे, अशोक कानडे, अशोक भोसले, राजेंद्र कोकणे, पंडितराव बोंबले, सागर मुठे उपस्थित होते.

R

Karan Sasane, Lahu Kanade
Nilesh Lanke On Ajit Pawar : "...म्हणून अजितदादांची माफी मागितली," राजीनाम्यानंतर लंकेंची प्रतिक्रिया

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com