Dada Bhuse News : मनमाड ते पंढरपूर रेल्वे सुरू करा ; दादा भुसेंचे रेल्वे राज्यमंत्र्यांना पत्र

Dada Bhuse, Raosaheb Danve News : राज्यातील वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविक जातात.
Dada Bhuse, Raosaheb Danve
Dada Bhuse, Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राज्यातील वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविक जातात. त्यांच्यासाठी मनमाड ते पंढरपूर अशी रेल्वे सुरू करण्याची मागणी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे केली आहे.

आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचा मेळा भरतो. विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी हे वारकरी पायी दिंडीतून, एसटी महामंडळाच्या बसने, खासगी वाहनांनी प्रवास करतात. त्यांच्या सोयीसाठी मनमाड येथून थेट रेल्वे सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर येथील भाविकांना प्रवासाची सोय होईल, अशी विनंती भुसेंनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.

Dada Bhuse, Raosaheb Danve
Bhavana Gawali News : उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला भावना गवळींनी दिले प्रत्युत्तर; म्हणाल्या, "ठाकरेंना कोणतेही नाते...

रेल्वे मंत्र्यांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे बघणे आवश्यक ठरणार आहे. पंढरपूरला दर वर्षी लाखो भाविक येत असतात. ही रेल्वे सुरू झाल्यानंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची सोय होईल, असेही भुसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

Dada Bhuse, Raosaheb Danve
Marathwada Water Supply : पश्चिम महाराष्ट्र विरूद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटणार; अजित दादांचे आश्वासन, पण शिंदे गटाचा विरोध

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक (Nashik) ते पुणे रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी आर्थिक तरतूद केली आहे. भुसंपादनाची प्रक्रिया सध्या सूरू असून लवकरच हा मार्ग दृष्टीपथात येईल.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com