
Maharashtra Local Politics 2025: शिवसेना ठाकरे गटातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु आहे. आता बडगुजर अध्यक्ष असलेल्या म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.
संघटनेच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार पाच वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढेही 2029 पर्यंत आपणच अध्यक्ष राहणार असल्याचा दावा बडगुजर यांनी केला आहे. तर बबन घोलप हे या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितल्यास आपण राजीनामा देऊ अशीही माहिती बडगुजर यांनी दिली. तर बबन घोलप यांनी देखील संघटनेबाबत अंतिम निर्णयाचे अधिकार आपल्यालाच असल्याचे म्हटले आहे.
बडगुजर यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांनी इतर कुठल्या दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यास संघटनेचे त्या पक्षात विलीनीकरण होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात घोलप म्हणाले संघटनेचे अन्य पक्षात विलीनीकरण होणार नाही. मी सांगितलं तर बडगुजर हे अध्यक्ष पदाचा राजीनामा देतील.
बडगुजर यांच्या हकालपट्टीनंतर आता अन्य व्यक्तीची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र बडगुजर यांनी झालेल्या ठरावानुसार आपणच पाच वर्ष अध्यक्ष असल्याचा दावा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. तर दुसरीकडे संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असल्याने मी बडगुजर यांना राजीनामा देण्यास सांगू शकतो किंवा कालावधी कमी-जास्त करण्याचा देखील मला अधिकार असल्याचा दावा घोलप यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी वेगळी वाट घेतल्यानंतर नाशिकमधील शिवसेना प्रणीत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून मतभेद उभे राहिले. त्यावेळी चार हजार सभासद असलेल्या आणि महापालिकेतील सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या या संघटनेच्या नेतृत्वावर अधिकार सांगण्यास सुरुवात झाली.
तेव्हा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी शिवसेनेवर दावा ठोकला. शिवसेनेच्या शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात कामगार सेनेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. या सभेत तत्कालीन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
संघटनेचे संस्थापक बबन घोलप यांनी तिदमे यांच्या जागी बडगुजर यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती जाहीर केली. पुढील कायदेशीर अडथळे टाळण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली. पण आता बडगुजर यांच्या हकालपट्टीनंतर पुन्हा वाद उफाळला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.