Sudhakar Badgujar News : भेट झाली असेल, व्हिडिओ मॉर्फ केलेला; सलीम कुत्ता प्रकरणावर ठाकरेंच्या नेत्याचे स्पष्टीकरण

Sudhakar Badgujar Viral Video With Salim Kutta : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीसोबत नाचताना सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि वादाला तोंड फुटले...
Sudhakar Badgujar
Sudhakar BadgujarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या सोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणेंच्या आरोपांना सुधाकर बडगुजर यांनी काही तासांतच प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. कुठल्याही चौकशीला तयार, असे म्हणत सुधाकर बडगुजर यांनी नितेश राणेंचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Sudhakar Badgujar
Nagpur Winter Session : बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी; राणेंनी विधानसभेत झळकावला फोटो

काय म्हणाले सुधाकर बडगुजर?

माझ्यावर जे सभागृहात आरोप झाले आहेत. त्यावर त्यांनी योग्य माहिती घेतलेली नाही. 2016 मध्ये विजया रहाटकर यांची वेगळ्या विदर्भासाठी नाशिकमध्ये झाली होता. ती सभा शिवसैनिकांनी आंदोलन करत उधळून लावली होती. त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये मीही 14-15 दिवस तुरुंगात होतो. अनेक शिवसैनिक माझ्यासोबत तुरुंगात होते. 15 दिवसांच्या तुरुंगवासात त्यामध्ये जे बॉम्बस्फोटाचे आरोपी होते तेही नाशिकच्या मध्यवर्ती तुरुंगात होते. आम्हाला हे माहिती नव्हते, असे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर म्हणाले.

राजकारणात येण्यापूर्वी माझ्याविरोधात एकही गुन्हा दाखल नव्हत. जे काही गुन्हे दाखल झाले ते राजकीय हेतूने आणि आंदोलनांमुळे झालेत. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ताशी आपले नाव जोडले गेले. त्याला 1992-93 मध्ये अटक झाली असेल ना. मात्र, 2016 मला अटक करून नाशिकच्या तुरुंगात ठेवले होते. तेव्हा तिथे तेही होते. यामुळे हा सगळा बेबनाव आहे. व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे, असे प्रत्युत्तर बडगुजर यांनी दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीसच म्हणाले होते..., बडगुजरांचा दावा

एखादा आरोपी पेरोलवर बाहेर आल्यानंतर सार्वजनिक जीवनात वावरू शकतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच म्हणाले आहेत. यामुळे अशा संदर्भात आमची भेट झाली असावी. किंवा सर्वाजनिक कार्यक्रमात ते ( सलीम कुत्ता ) आले असतील तर त्याची आपल्याला माहिती नाही, असे स्पष्टीकरण बडगुजर यांनी दिले.

बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या सलीम कुत्ता याच्याशी आपले संबंध कुठलेही संबंध नव्हते, नाहीत आणि राहणारही नाहीत. मी तुरुंगात 14 दिवस होतो. त्या ठिकाणी तेही तिथे होते. या व्यतिरिक्त काहीही संबंध नाही, असे बडगुजर म्हणाले.

सार्वजनिक जीवनात कुठे भेट झाली असेल तर आपल्याला माहिती नाही. पण व्हायरल झालेला व्हिडिओ मॉर्फ केलेलाही असू शकतो. या प्रकरणी चौकशीत पोलिसांना सहकार्य करण्याची आपली पूर्ण तयारी आहे. सलीम कुत्ता तुरुंगाबाहेर का आला? पेरोलवर असताना भेट झाली की आतमध्ये भेट झाली हे चौकशीत स्पष्ट होईल, असे सुधाकर बडगुजर म्हणाले.

Sudhakar Badgujar
Shivsena Politics : बडगुजर यांचा दादा भुसेंना टोला, ‘तुम्ही नोकरीतून निलंबित का झाले’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com