Sudhir Mungantiwar Politics: सुधीर मुनगंटीवार यांचा भाजपला घरचा आहेर, ‘पक्ष म्हणजे शनी शिंगणापूर होऊ नये’

Maharashtra Political News: भाजप पक्षात सुरू असलेल्या घाऊक इनकमिंग वर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली नाराजी.
Sudhir-Mungantiwar
Sudhir-MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Sudheer Mungantiwar News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात घाऊक इनकमिंग सुरू आहे. तो पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांसाठी नाराजीचा विषय आहे. ही नाराजी आता थेट माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही व्यक्त केली आहे.

माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवारी नाशिकला होते. यावेळी मुनगंटीवार यांनी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतले. आपला खाजगी दौरा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी श्री मुनगंटीवार यांचे स्वागत केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात भाजप पक्षात अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर, सुनील बागुल यांसह विविध नेत्यांच्या प्रवेशाबाबत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र वेगळा सूर आळवला होता. मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या प्रवेशांबाबत आग्रही आहेत.

Sudhir-Mungantiwar
Chhagan Bhujbal : राज-उद्धव ठाकरे युतीवर छगन भुजबळ यांच्या सुचक इशाऱ्याने नवा अँगल?

या संदर्भात श्री मुनगंटीवार यांनी, पक्षात नेत्यांचे प्रवेश होतच असतात. त्यात वेगळे काही नाही. मात्र उठ सूट कोणालाही प्रवेश द्यावा, या मताचा मी नाही. नेत्यांना प्रवेश देताना स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना देखील लक्षात घेतल्या पाहिजे.

पक्ष हा काही शनिशिंगणापूर होता कामा नये की, त्याला दरवाजेच नसावेत. प्रवेश देताना स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पक्षासाठी कार्यरत राहताना अनेकांची संघर्ष केलेला असतो. ज्यांच्याशी संघर्ष केला तीच पक्षात येत असतील, तर वेगळ्या प्रतिक्रिया उमटणारच. ही कार्यकर्त्यांची भावना मी व्यक्त करीत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगेन.

मी त्रंबकेश्वरला भक्त म्हणून दर्शनासाठी आलो होतो. मंत्री पदासाठी मी दर्शनाला गेलो नाही. सध्याची स्थिती फार वेगळी आहे. उद्या मी मंत्री झालो आणि एखादा चुकीचा शब्द तोंडातून गेला तर चार-पाच दिवस मीच टीव्हीवर दिसणार. ज्यामुळे मी आहे तिथे ठीक आहे, असा टोमणा त्यांनी सध्या बहुचर्चीत नाशिकच्या मंत्र्याचा उल्लेख टाळत केला.

पुणे येथील घटनेत संबंधित मुलींच्या तक्रारींवरून गुन्हा दाखल व्हायलाच हवा. गुन्हा जरूर दाखल व्हायला हवा. खेदाची गोष्ट म्हणजे या घटना महाराष्ट्रात वाढत आहेत. आपण एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असे म्हणतो. दुसरीकडे तक्रार करणाऱ्या महिलांनाच न्याय मिळत नसेल तर खेदाची बाब आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर आगामी काळात त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com