Maharashtra Politics : आमदार सुहास कांदे सरकारला कोर्टात खेचणार?

Suhas Kande Politics, he will take State & Centre in High court onDrought issue-छगन भुजबळ आणि पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघात दुष्काळ कसा, असा कांदे यांचा सवाल
CM Eknath Shinde & Suhas Kande
CM Eknath Shinde & Suhas KandeSarkarnama
Published on
Updated on

MLA Suhas Kande News : नांदगाव मतदारसंघात दुष्काळाची स्थिती आहे. ती पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघापेक्षा अधिक आहे, मग नांदगाव मतदारसंघच कसा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळला जातो, असा प्रश्न एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. (Nandgaon was ont inclueded in drought affected Constituencies of Maharashtra)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या अडचणी वाढविण्याची तयारी त्यांच्याच गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी सुरू केली आहे. मतदारसंघात विरोधकांनी घेरल्यावर त्यांनी सरकार (Maharashtra Government) विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

CM Eknath Shinde & Suhas Kande
Manoj jarange Patil Security : मनोज जरांगे पाटलांना सरकार 'Z+ सिक्युरिटी' पुरवणार ?

यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यावर आमदार कांदे मतदारसंघातील त्यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसने उघडलेल्या मोहिमेनंतर प्रचंड अस्वस्थ झाले आहे. यापूर्वी त्यांनी राज्य सरकार आपल्या मतदारसंघाला दुष्काळग्रस्त जाहीर करेल, असा विश्वास व्यक्त केला होता. तो विश्वास फोल ठरल्याने त्यांची कोंडी करण्याची व्यूहरचना विरोधकांनी केली आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या संमतीनंतर दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत केवळ मालेगाव आणि येवला हे मतदारसंघ आहेत. वस्तुतः सरकारचे दुष्काळाबाबतचे जे निर्देश आहेत, त्यात नांदगाव तालुका सर्व निकष पूर्ण करतो.

पेरणीचे क्षेत्र, जमिनीतील ओलावा, एनबीव्ही वनस्पतीचे निर्देशांक, भूगर्भातील पाण्याची पातळी हे सर्व निकष विचारात घेतल्यास येवल्यापेक्षा जास्त दुष्काळ नांदगावमध्ये आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक नांदगाववर अन्याय झालेला आहे. याबाबत राज्य शासनाने हा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास तो अन्याय असेल. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागेल, असा इशारा आमदार कांदे यांनी दिला आहे.

CM Eknath Shinde & Suhas Kande
Suhas Kande News : राष्ट्रवादी, शिवसेनेकडून आमदार कांदेंची कोंडी?

राज्य सरकारच्या निर्णयाने आमदार कांदे यांची कोंडी झाली आहे, हे नक्की. ही राजकीय संधी त्यांचे विरोधक अजिबात सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात पाच माजी आमदारांनी एकजूट केली आहे. त्यातील माजी आमदार संजय पवार त्यातून बाहेर पडले आहेत. मात्र, उर्वरित चार आमदार मंत्री छगन भुजबळ यांच्या गटात दाखल झालेले आहेत. त्यामुळे कांदे यांची झोप उडाली आहे. त्यातून राज्य सरकारला थेट इशारा देत न्यायालयात जाण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्याच गटाच्या आमदाराने दंड थोपटले आहेत.

CM Eknath Shinde & Suhas Kande
Ahemadnagar News : सोनईत प्रशांत गडाखांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com