Nashik Politics Crime: आंबेडकरांचा गंभीर आरोप; 'टीसीएस' प्रकरणात भाजपच्या 'स्क्रिप्ट'नुसार पोलिसांचा तपास!

TCS Conversion Case: विविध गुन्हेगारी प्रकरणांमुळे नाशिक शहर सध्या चर्चेत आले आहे. भोंदू कॅप्टन अशोक खरात, टीसीएस धर्मांतरण प्रकरण आणि नीट परीक्षेचा पेपर लिक यामुळे शहराला गालबोट लागले आहे. याच प्रश्नांवर सुजात आंबेडकर यांनी बोट ठेवले आहे.
Sujat Ambedkar TCS  .jpg
Sujat Ambedkar TCS .jpgSarkarnama
Published on
Updated on

Sujat Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी नाशिक पोलिसांवर गंभीर आरोप केला. पोलिसांच्या कार्यपद्धती वादाचा विषय आहे. आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे नवा राजकीय वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.

विविध गुन्हेगारी प्रकरणांमुळे नाशिक शहर सध्या चर्चेत आले आहे. भोंदू कॅप्टन अशोक खरात, टीसीएस धर्मांतरण प्रकरण आणि नीट परीक्षेचा पेपर लिक यामुळे शहराला गालबोट लागले आहे. याच प्रश्नांवर सुजात आंबेडकर यांनी बोट ठेवले आहे.

टीसीएस प्रकरणात शोध पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि अन्य पत्रकार वेगळे फॅक्ट फाइंडिंग करीत आहेत. त्यात कुठेही टीसीएस कंपनीत धर्मांतरण झाल्याचे दिसत नाही. कुठेही फॉरेन फंडिंग चा पुरावा मिळालेला नाही.

भोंदू कॅप्टन खरात प्रकरणात देखील याच पद्धतीने तपास सुरू आहे. असंख्य पोलीस अधिकारी त्याचा तपास करीत आहेत. मात्र या प्रकरणात किती आरोपी अटक झाले, कोणते राजकीय हितसंबंध उघडकीस आले हा गंभीर प्रश्न आहे.

Sujat Ambedkar TCS  .jpg
NCP internal conflict : दोनवेळा पंख छाटले, गुपचूप शरद पवारांना भेटले, योग्य वेळी बोलण्याचं सूचक विधान : पटेल-तटकरे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत?

नीट पेपर लीक प्रकरणात नाशिकचा संबंध आढळला आहे. युवक प्रदीर्घकाळ आणि इस पंचवीस वर्ष अभ्यास करून परीक्षा देतात. त्यांना करिअरची दारे उघडतील अशी अपेक्षा असते. मात्र त्याच वेळी नीट ची प्रश्नपत्रिका लिक होते. हा गंभीर प्रश्न आहे.

या तिन्ही घटनांमुळे नाशिकच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले आहे. या संदर्भात पोलिसांनी तपास यंत्रणांची भूमिका देखील चर्चेचा विषय आहे. पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्षपणे तपास करून गुन्हे उघडकीस आणावेत, असे आंबेडकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com