Agasti Sugar Factory Election : अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सुनीता भांगरेंची बिनविरोध निवड

Agasti Cooperative Sugar Factory Vice President Election : या निवडणुकीकडे अकोलेकरांचे लक्ष लागले होते.
Agasti Sugar Factory Election
Agasti Sugar Factory Election Sarkarnama
Published on: 
Updated on: 

अहमदनगर : अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक भांगरे यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं. त्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनीता भांगरे यांची बिनविरोध संचालकपदी निवड झाली.

पण अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असतानाच आज माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता भांगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Agasti Sugar Factory Election
Shivsena Shinde group News : ‘अयोध्या मे शंखनाद, आ रहे है एकनाथ’

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेकांची नावे होती. मात्र, सुनीता भांगरे यांनाच ही जबाबदारी देण्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर आज अधिकृत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Agasti Sugar Factory Election
Market Committee News : शेतकऱ्यांना निवडणूक लढण्याची संधी दिल्याने अर्जांचा अक्षरशः पाऊस..

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कै.अशोकराव भांगरे यांचा महत्वाचा वाटा होता. मात्र, अशोकराव भांगरे यांचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या संचालक आणि उपाध्यक्ष पदाच्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनिता भांगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com