Jayant Patil News : शिंदे गटातील नेते 'कमळा'च्या चिन्हावर निवडणूक लढतील; जयंत पाटलांचं भाकीत !

Jayant Patil News : हळूहळू समजेल पुढे काय होईल...
Jayant Patil News :
Jayant Patil News :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मागील काही दिवसांपासून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये शाब्दीक वार - प्रतिवार होत होते. वर्तमानपत्रातील जाहीरातबाजीवर भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता. 'ती' जाहीरात आम्ही दिलीच नाही, असा घुमजाव शिवसेनेच्या नेत्यांकडून केला गेला. दुसऱ्या दिवशी आणखी एक जाहीरात देवून सारवासारव करण्याचाही प्रयत्न झाला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावर भाष्य केले आहे.

Jayant Patil News :
Praful Patel on Ajit pawar : 'माझे अन॒ शरद पवारांचे संबंध किती गहन आहेत, हे कळायला अजितदादांना अनेक वर्षे लागतील'

भाजपने सत्ता टिकावी यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासमोर गुडघे टेकवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नेते शिंदे गटातील सर्व नेते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या आग्रह धरतील, असं भाकीत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. निवडणुकीला एक वर्षाचा काळ बाकी आहे, येत्या काळात याबाबत जनतेला हळूहळू समजेल, असंही पाटील म्हणाले.

"आताच्या सरकारमध्ये हे शिंदे-फडणवीस अगतिकतेने एकत्रित आलेले आहेत. भाजपने सत्ता टिकावी यासाठी शरणागती पत्करूली असून, एकनाथ शिंदेंसमोर सपशेल गुडघे टेकले आहेत. शिंदेंसाठीही एकप्रकारे यासाठी अदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नाईलाजाने दोघांना एकत्र राहावं लागतंय, यामुळे शिंदे-भाजपमध्ये थोडेफार वाद होत राहील, असेही पाटील म्हणाले.

Jayant Patil News :
Eknath Shinde in Adipurush : 'आदिपुरुष' मध्ये मुख्यमंत्री शिंदेंची 'एन्ट्री'; Photo व्हायरल, पोलिसांची डोकेदुःखी वाढली..

यापुढे कदाचित शिंदे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढायला, कुणीच उभं राहणार नाही. शिंदे गटातील सगळेच उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभं राहण्याचा आग्रह करतील, लोकसभेला अजून एक वर्ष आहे, हळूहळू आपल्याला कळेल," असेही जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com