

Jalgaon News, 10 Sep : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून AI तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी चेन्नई पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथून एका होमगार्डला अटक केली आहे. मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने मुख्यमंत्र्यांच्या नावाने सोशल मीडिया अकाउंट सुरू केले होते. या माध्यमातून विजय यांचे AI-निर्मित व्हिडीओ तसेच आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्या जात होत्या. हा प्रकार समोर आल्यानंतर ५ सप्टेंबर रोजी चेन्नईतील वेस्ट झोन सायबर क्राईम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. बनावट अकाउंटचा माग काढताना त्याचा IP Address जळगावमधील नशिराबाद परिसराशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईमचे पथक जळगावात दाखल झाले.
नशिराबाद पोलिसांच्या मदतीने तपास करत पोलिसांनी मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन याला ताब्यात घेतले. तो होमगार्ड म्हणून कार्यरत असल्याचेही तपासात समोर आले आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चेन्नई पोलिस आरोपीला पुढील तपासासाठी चेन्नईला घेऊन गेले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट तयार करण्यामागे आरोपीचा नेमका हेतू काय होता, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास चेन्नई सायबर क्राईम पोलीस करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.