Flex war In Shiv Sena : ठाकरे गटाकडून ‘त्या’ बॅनर्सला सणसणीत उत्तर; ‘कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी मी शिवसेना...’

Thackeray Vs Shinde : बाळासाहेबांच्या वक्तव्याचा आधार घेत एक बॅनर लावून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला उद्धव ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिले आहे.
Shivsena Flexwar
Shivsena FlexwarSarkarnama

Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांतील वाद शिगेला पोहोचला आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी दोन्ही गटांकडून सोडली जात नाही. शिवसेना भवनासमोर ‘मी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना निर्माण केली नाही’ या वक्तव्याचा आधार घेत एक बॅनर लावत भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला उद्धव ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता पुन्हा वाद रंगला असून, उद्धव ठाकरे गटाच्या आक्रमक झालेल्या शिवसैनिकांना रोखण्यासाठी स्थानिक पोलिस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. (Flex war was fought between two factions of Shiv Sena)

यापूर्वीही शिवसेनेच्या दोन्ही गटांत बॅनर वाद रंगला होता. इंडिया आघाडीच्या बैठकीदरम्यान मुंबईत सगळीकडे निनावी बॅनर्स झळकले होते. त्यामध्ये ‘मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही’ या बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचे बॅनर्स लावून इंडिया बैठकीदरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात आलेला होता. त्यावेळी इंडिया आघाडीची बैठक सुरू असल्याने ठाकरे गटाने या बॅनरला प्रत्युत्तर दिले नव्हते.

Shivsena Flexwar
Babasaheb Deshmukh Meet Jarange : मराठा आंदोलकांनी कुठल्याही नेत्याच्या स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये; बाबासाहेब देशमुखांनी घेतली जरांगेंची भेट

इंडिया आघाडीच्या बैठकीचे यजमानपद त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे होते. त्या वेळी त्यांनी संयमाची भूमिका घेत योग्य वेळी तत्कालीन बॅनर्सला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवसेनेचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट छोट्या छोट्या मुद्द्यांवरून आमने-सामने येताना दिसत आहेत. विशेषतः मुंबईत जोरदार फ्लेक्सयुद्ध रंगले आहे.

Shivsena Flexwar
Maratha Reservation Movement : देवेंद्र फडणवीसांना जाणूनबुजून खलनायक ठरवलं जातंय; नीलम गोऱ्हेंकडून पाठराखण

आता शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या एका वक्तव्याची आठवण करून देणारं एक बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आलं आहे. त्यामध्ये ‘मी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना निर्माण केली नाही’ या वक्तव्याचा आधार घेत भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाला उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या बॅनरमुळे शिंदे गटाची आता चांगलीच अडचण झाली आहे. त्यामुळे आता या बॅनरला शिंदे गटाकडून कशा प्रकारे प्रत्युत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com