Nashik Graduate Election Result: नाशिकमध्ये सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटलांमध्ये काटेकी टक्कर...

Satyajit Tambe Vs Shubhangi Patil : नाशिक पदवीधर निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Satyajit Tambe, Shubhangi Patil
Satyajit Tambe, Shubhangi PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik Election News : नाशिक पदवीधर निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ही मतमोजणी २ वाजता सुरु झाली आहे. नाशिकमधून पहिली अपडेट समोर आली आहे. त्यामध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगा पाटील (Shubhangi Patil) यांच्यामध्ये टक्कर असल्याचे सांगितले जात आहे.

सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात पहिल्या फेरीपासून अटीतटीची लढत आहे. दोघांच्याही नावासमोर मतपत्रिकांचा जवळपास सम-समान गट्टे आहेत. त्यामुळे निकालाबाबत आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Satyajit Tambe, Shubhangi Patil
Marathwada Teacher Constituency Result : कोटा ठरला, विजयासाठी २५ हजार ३८६ मतांची गरज ; काळे `विक्रम` करणार..

दरम्यान, विधान परिषजेच्या चार जागांवर सध्या मतमोजणी सुरु आहे. तर विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे (BJP) ज्ञानेश्वर म्हात्रे दणदणीत विजयी झाले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

कोकणात पदवीधर मतदारसंघात एकूण ९१.०२ टक्के मतदान झाले होते. यात आता कोकणात भाजप चे ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांना २० हजार ८०० मते मिळाली आहेत. तर बाळाराम पाटील यांना अवघ्या ९ हजार ५०० मतांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी गेल्या वेळेपेक्षा अधिक मतदान झाले होते.

Satyajit Tambe, Shubhangi Patil
MVA News: महाविकास आघाडी पुरस्कृत, विमाशिचे सुधाकर अडबालेंची आघाडी कायम !

नाशिकमध्ये यावेळी मतदानाचा टक्का घसरला होता. त्यामुळे नेमका घसरेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. मात्र, सुरुवातीला तरी तांबे आणि पाटील यांच्यामध्ये टक्क दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com