Dombivali News : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या अनुषंगानेच प्रत्येक मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नेते मंडळींनी दौरे आणि बैठकांचा धडाका लावला आहे.
आता कल्याण लोकसभा मतदारसंघातदेखील सर्वच पक्ष सक्रिय झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार, भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर सोमवारी ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांची जाहीर सभा कल्याणमध्ये होत आहे.
शिवसेनेच्या (ठाकरे गट) नवीन शाखेच्या उद्घाटनासाठी भास्कर जाधव हे कल्याणमध्ये येत आहेत. शिवसेनेत शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे व शिंदे गटात शिवसेना विभागली गेली. यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात शहरातील विविध शाखा ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटांत जोरदार विरोध झाला, तर काही शाखा या अनधिकृत ठरवत शासनाकडून जमीनदोस्त करण्यात आल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या नाट्यानंतर आता ठाकरे गटाकडून आपली ताकद वाढवण्यासाठी नव्याने शाखा उघडण्यास सुरूवात झाली आहे. आज मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभेतील कल्याण पूर्व हनुमाननगर परिसरात प्रभाग क्र.97 शनीनगर ही शाखा उघडण्यास येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची कल्याण पूर्वेतील पहिली शाखा सुरू होत आहे.
विभाग प्रमुख संजय गुजर व शाखा प्रमुख प्रतीक राय यांच्या वतीने ही शाखा सुरू करण्यात येत असून, सायंकाळी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाआधी कल्याण पूर्वमध्ये ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी करत शक्तिप्रदर्शन करत करण्यात आले आहे. तसेच सभेसाठी मोठ्या प्रमाणात तयारीदेखील करण्यात आली आहे.
दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष यांचे दौरे सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीदेखील या मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. भाजप राष्ट्रवादी जोरदार कामाला लागलेली असताना आता शिवसेना ठाकरे गटानेदेखील आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेना शाखा सुरू करत आपला जम बसविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. या शाखेचे उद्घाटन भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या वेळी ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शनदेखील करण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट सक्रिय झाले असून, संध्याकाळी मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.