

Tushar Bhosle supports Vidyanand Bapat : गणेशोत्सवात लाऊडस्पीकरच्या भिंती लावायला कडाडून विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट या पुणेकर नागरिकांनं सध्या संपूर्ण मीडियातली स्पेस व्यापून टाकली आहे. या बापट यांना आता पुणेकर नागरिकही जाहीर पाठिंबा देत आहेत. त्यामुळं आता फडणवीस सरकारही या विषयाबाबत बॅकफूटवर गेलं आहे. मुख्यमंत्र्यांनाही याबाबत संदिग्ध प्रतिक्रिया द्यावी लागली. त्यानंतर आता भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसला यांनी बापट यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
साम टीव्हीच्या सुत्रांनुसार, गणेशोत्सवातील डीजेवर बंदीच्या मागणीचं भाजपकडून पहिल्यांदाच समर्थन करण्यात आलं आहे. गणेशोत्सव काळात डीजेवर बंदी असावी अशी भूमिका भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी मांडली आहे. त्यांनी पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन गणेश मंडळांना केले आहे.
बापटांवर बोलताना भोसले म्हणाले, "मी विद्यानंद बापट यांच्या सर्व मतांशी सहमत नाही, मात्र गणेशोत्सवात डीजे बंदीच्या मागणीला माझं समर्थन आहे", तसंच नागपूर आणि सोलापूरमध्ये डीजे बंदीच्या पोलीस आयुक्तांच्या निर्णयाचंही त्यांनी स्वागत केलं असून नागपूर-सोलापूरच्या धर्तीवर संपूर्ण राज्यात डीजे बंदीची मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यातील भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधींनाही याबाबत पत्र पाठवणार असल्याचं तुषार भोसले यांनी स्पष्ट केलं आहे.
तसंच ट्विटद्वारे 'पारंपारिक उत्सव' हा हॅशटॅग देत तुषार भोसले यांनी म्हटलं की, आपल्याकडं शंख, ढोल-ताशे, टाळ, मृदंग, झांज, बासरी आदी भरपूर मंगल वाद्ये आणि तितकेच निष्णात कलावंत यांची मोठी परंपरा असताना DJ ची गरजच का आहे? आपले धार्मिक सण-उत्सव हे आपल्याच परंपरांनी नटलेले असावेत. परंपरा जोपासूया, वाद नको! असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.