Dhananjay Munde news : मुख्यमंत्री साहेब, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक संकटात..! धनंजय मुंडेंचे CM फडणवीसांना पत्र

Devendra Fadnavis, Beed Drought News, Beed Farmer News : बीडसह परळी मतदारसंघात पिके करपू लागल्याने धनंजय मुंडे यांची कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीच्या सवलती व आर्थिक मदतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
CM Devendra Fadnavis Dhananjay Munde
CM Devendra Fadnavis Dhananjay Munde sarkarnama
Published on
Updated on

Beed news : गेल्या महिन्याभरापासून गायब झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पहिल्या पावसात पेरणी केलेली पिकं अक्षरशा करपू लागली आहेत. अजूनही पावसाचा पत्ता नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघासह बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात पावसाने तीव्र ताण दिल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात खरिपातील पिके अक्षरश: करपू लागली आहेत. शेतकरी व सर्वसामान्य नागरिक संकटात सापडले असून बीड जिल्ह्यात पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार कोरडा दुष्काळ जाहीर करून त्यानुसार सवलती देण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.

खरिपातील पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचीही विनंतीही मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अवर्षणामुळे तलाव - विहिरी कोरड्या पडत असून पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील आगामी काही दिवसात गंभीर होणार आहे, या दुष्काळचक्रावर नियंत्रण आणण्यासाठी विशिष्ट नियोजन करण्यासोबतच कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्याचीही मागणी मुंडे यांनी केली.

CM Devendra Fadnavis Dhananjay Munde
Rahul Gandhi News : वडिलांचं डोकं फोडलं, आरोपी मंत्र्यांमुळे मोकाट, मला मदत करा! निशूने आवाज उठवताच राहुल गांधींनी दिला आधार, दिल्लीत घमासान

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. केवळ लातूर बीडच नाही तर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरड्या दुष्काळा सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

CM Devendra Fadnavis Dhananjay Munde
Supreme Court Shiv Sena case : सुप्रीम कोर्टात ठाकरेंची भिस्त असलेल्या मुद्दालाच शिंदेंच्या वकिलांनी हात घातलाय; गेमचेंजर ठरणार?

दरम्यान, बीड, लातूरसह राज्याच्या बहुतांश भागातून पाऊस गायब झाला आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्याने धरणांमधील पाणीसाठी वेगाने कमी होऊ लागला आहे. ही स्थिती अशीच राहिल्यास पिण्याच्या पाण्याचीही गंभीर टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com