

Nashik NMC Election News: महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष लवकरच आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. नाशिककरांच्या अपेक्षा आणि मागण्या याचे प्रतिबिंब त्यात असेल. यासंदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकारी निवडणूक तयारीत व्यस्त आहेत.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज भाग घेतला. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून निवडणुकीचा आढावा घेतला. उमेदवारांना सर्व प्रकारची ताकद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजप पक्षाची युती झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि एकनाथ शिंदे एकत्र आले आहेत. मात्र मैत्रीपूर्ण लढती आणि भाजप हा सहकारी पक्ष असल्याने त्यावर टीका करण्यात नसल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जनता नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. या महापालिकेच्या निवडणुकीतही त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल.
उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही विकासाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे गेली 25 वर्ष मुंबई महाराष्ट्र पासून तोडणार या एकाच मुद्द्यावर ते प्रचार करतात. निवडणुका आल्या की हा मुद्दा हमखास पुढे केला जातो.
मुंबई महाराष्ट्र पासून तोडणार कोण? हे एकदा उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे. त्याचे नाव जाहीर केल्यास आम्ही देखील मुंबईसाठी रस्त्यावर उतरू. मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे काम केले आहे.
नाशिक सह परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी दहा हजार कोटी रुपयांचा निधी दिला. अनेक प्रकल्प मार्गी लावले आहे. ठाणे महापालिकेच्या नियमानुसार नाशिकच्या इमारतींचा देखील विकास केला जाईल.
नाशिकला रोजगार निर्मितीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष प्रयत्नशील आहे. महिंद्रा उद्योग समूहाचा नवा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल. आयटी पार्क उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे उद्योग मंत्री सामंत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.