Uddhav Thackeray Politics : उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये मोठी खेळी, 'मामांना' पद देऊन बागूलांना थांबवलं..

Uddhav Thackeray appoints Mama Rajwade as Shiv Sena (UBT) Nashik City Chief to retain loyalists like Sunil Bagul and counter defections : मामा राजवाडे यांना महानगरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यामागे उद्धव ठाकरेंची मोठी खेळी असून ती आता समोर आली आहे. राजकीय वर्तुळात सध्या उद्धव ठाकरेंच्या या खेळीची चर्चा आहे.
Sunil Bagul, Uddhav Thackeray
Sunil Bagul, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगप्रमुख विलास शिंदे हे शिवसेना (शिंदे गटात) जात असल्याचे कळताच त्यांच्या पक्षप्रवेशाआधीच उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. शिंदेंच्या जागी श्रमिक सेनेचे मामा राजवाडे यांना उद्धव ठाकरे यांनी महानगरप्रमुख पद दिलं. स्वत: संजय राऊत यांनी एक्स पोस्ट करुन तशी माहिती दिली.

नाशिकमध्ये अगदी वेगाने या सगळ्या घडामोडी घडल्या. मामा राजवाडे यांना महानगरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यामागे उद्धव ठाकरेंची मोठी खेळी असून ती आता समोर आली आहे. मामा राजवाडे हे निष्ठावंत शिवसैनिक असून पक्षाचे उपनेते सुनील बागूल यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. मामांना पद देण्याच्या निमित्ताने बागूल यांना देखील पक्षात थांबविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. राजकीय वर्तुळात तशी चर्चाही सुरु आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच मामा राजवाडे यांना हे पद देण्यात आल्याचे स्वत: संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करुन सांगितलं. राजवाडे सध्या उपजिल्हाप्रमुख आहेत. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हे पद त्यांना दिले आहे. त्यासोबतच बागूल यांनादेखील पक्षातच कसं थांबवता येईल या हेतुने ठाकरेंनी रणनिती आखल्याचे दिसते.

Sunil Bagul, Uddhav Thackeray
Girish Mahajan Politics : गिरीश महाजनांनी चाक फिरवलं, शिंदे गटाकडे निघालेल्या बड्या नेत्याची गाडी भाजपकडे वळली..

महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागली आहे. एक-एक करुन पदाधिकारी, नेते, माजी नगरसेवक पक्षाला सोडून जात आहेत. भाजप व शिवसेना (शिंदे) पक्षाने उबाठा पक्षाला जणू पोखरण्याचे काम चालवलं आहे. अशात ही गळती रोखण्यासाठी संजय राऊत यांच्यासह उद्दव ठाकरे हे देखील प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून सोडून गेलेल्या वा चाललेल्या पदाधिकारी व नेत्यांच्या जागी नवीन लोकांना पदे व जबाबदाऱ्या देताना त्यामागे विशिष्ट हेतू ठेवून विचारपूर्वकच त्या दिल्या जात असल्याचं दिसतं.

Sunil Bagul, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Politics : नाशिकमध्ये स्फोटक घडामोडी, ठाकरे गटातून 'शिंदे आउट' 'मामा इन'..

मामा राजवाडे गेल्या २२ वर्षांपासून पक्षात प्रामाणिकपणे काम करत आहेत. सहा महिन्यापूर्वीच त्यांच्यावर उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांना महानगरप्रमुख पद देण्यात आलं आहे. माझं काम बघून पक्षाच्या नेत्यांनी मला न्याय दिल्याची भावना नियुक्तीनंतर राजवाडे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मामा राजवाडे यांना पद देताना एका निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय देणं हा पहिला हेतु तर सुनिल बागुलांसारख्या मोठ्या नेत्याला पक्षातच रोखणं हाही दृष्टिकोन उद्धव ठाकरेंनी ठेवल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com