Mumbai : मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा; तर मुंबईत मुख्यमंत्री शिंदे राज ठाकरेंच्या घरी; चर्चेला उधाण

Raj Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहचले आहेत.
Raj Thackeray and Eknath Shinde
Raj Thackeray and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला 'शिवतीर्थ' या त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

एकीकडे उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या मालेगावमध्ये थोड्याच वेळात जाहीर सभा पार पडणार आहे. मात्र, त्या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीला'शिवतीर्थ' या निवासस्थानी गेले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Raj Thackeray and Eknath Shinde
Malegaon News; ज्यांना मोठे केले ते पळाले...शिवसैनिक शिवसेनेसोबतच!

तसेच गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न मांडला होता. अजूनही भोंग्याचा विषय संपलेला नाही. राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालावं, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

''त्याबरोबरच एकतर सरकारने लाउडस्पीकर बंद करावेत, अन्यथा आमच्याकडे दुर्लक्ष करा. आम्ही लाउडस्पीकर बंद करतो'', असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला होता. तसेच याविषयासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, असंही ते म्हणाले होते.

Raj Thackeray and Eknath Shinde
Sandipan Bhumre News : `छत्रपती संभाजीनगर` व्हावे हे बाळासाहेबांचे स्वप्न आम्ही पुर्ण केले...

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे हे आज राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यामुळे या भेटीदरम्यान काही राजकीय चर्चा होणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे. पण ही भेट नेमकी कशा संदर्भात आहे, याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मात्र, त्यांची ही भेट कौटुंबिक असल्याचं कारण सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com