Thackeray Vs Shinde : शिवजयंतीपूर्वीच नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटात वादाची ठिणगी; गुन्हा दाखल...

Nashik Crime News : दोन्ही गटात हाणामारीसह अगदी फायरींग सुद्धा झाली होती...
Thackeray Vs Shinde :
Thackeray Vs Shinde :Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकरोड येथे आयोजित केली जाणारी शिवजयंती ही शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी अस्मितेची बाब आहे. यासाठी दोन महिन्यापूर्वीपासून तयारी करण्यात येते. हजारो शिवसैनिक नाशिकरोडला दाखल होतात. मात्र, गत वर्षीपासून येथे शिंदे आणि ठाकरे गट समोरासमोर उभे ठाकून शिवजंयतीवर उत्सवावर हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यातूनच मागील वर्षी दोन्ही गटात हाणामारीसह अगदी फायरींग सुद्धा झाली होती. यंदाच्या शिवजयंतीच्या बैठका सुरू झालेल्या असताना आता ठाकरे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Latest Marathi News)

Thackeray Vs Shinde :
NCP News : झिरवाळ यांनी धरला ठेका, अजितदादा मात्र नाचलेच नाहीत!

विहीतगाव सिग्नलजवळ दोन गटात वाद उभा राहिला. ठाकरे गटाचे अस्लम युसूफ मणियार आणि योगेश गाडेकर हे गत शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फ्लेक्स लावण्यासाठी जागेची पाहणी करीत होते. यावेळी शिंदे गटाचे राहुल बनकर उर्फ लवटे, हर्षद बागूल, प्रशांत बागूल हे तेथे आले. त्यांनी ‘तू येथे काय करतोय’, अशी विचारणा केली. मणियार यांनी ‘तुला काय अडचण’ असा प्रश्न उपस्थित केला. त्यातून संशयित आरोपींनी फिर्यादी मणियावर हल्ला चढवला. यात प्रशांतकडील हत्यार जमिनीवर पडले. हत्यार पडल्याने तू वाचला, दोन दिवसात तुझा गेम करतो, अशी धमकी मणियार यांना देण्यात आली.

Thackeray Vs Shinde :
Bharat Jodo Nyay Yatra: 'न्याय यात्रे'चा ताफा भाजप कार्यकर्त्यांनी अडवला; राहुल गांधींनी स्मित हास्य करत दिला फ्लाइंग किस

या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. गत वर्षी देवळालीतील सार्वजनिक पार येथे 2022 मध्ये जानेवारी महिन्यातच हे दोन्ही गट परस्परांना भिडले होते. सर्वपक्षीय शिवजन्मोत्सवाची बैठक सुरू असताना शिवसेनेच्या शिंदे गटाचे लवटे बंधू आणि ठाकरे गटाचे अस्लम मणियार यांच्यात शिवजन्मोत्सवाचे आयोजक कोण? यावरून वाद झाला.

शिवजयंती शिंदे गटाची असून, त्यास सर्वपक्षीय म्हणू नका, अशी मागणी लवटे बंधूनी केली. तसेच, गत वर्षीचा हिशोबही शिंदे गटाने मागितला. या वादात शिवीगाळ, धक्काबुक्की होताच मणियार गटाने लाठकाठ्या आणि कोयत्यांनी हल्ला केला, असा दावा लवटेंनी केला होता. तसा गुन्हा दाखल झाला होता. तर, ठाकरे गटातील सागर कोकणेच्या फिर्यादीवरून संशयित स्वप्निल लवटेने पिस्तुलातून त्याच्या दिशेने गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. परस्पर विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची सुनावणी सुरू आहे. बरोबर एका वर्षानी पुन्हा दोन्ही गटात वाद सुरू झाला असून, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com